Maharashtra Kesari Kusti 2019-20 Semi Final (Photo Credits: Maharashtra State Wrestling Association Facebook Page)

63rd Maharashtra Kesari Kusti Semi Final:  महाराष्ट्रातील कुस्तीवीरांसाठी प्रतिष्ठेची असलेली केसरी कुस्ती स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज पुणे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीत 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सेमीफायनल रंगणार आहे. माती आणि गादी विभागातील सामन्यांची आज 5 च्या सुमारास सामन्यांना सुरूवात होणार आहे. दरम्यान या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग युट्युब चॅनेलच्या माध्यमातून जगभरातील कुस्ती प्रेमींना पाहता येणार आहे. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते. Maharashtra Kesari 2019-20 Semi Final Live Streaming: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेमधील रंगतदार सामने इथे पहा लाईव्ह; बाला रफीक शेख, अभिजित कटके आज उतरणार मैदानात!

महाराष्ट्र केसरी खुला गटातील लढती सेमी फायनल मधील लढत

गादी विभाग

■ सचिन येलभर (मुंबई उपनगर) विरूद्ध हर्षवर्धन सदगीर (नाशिक)

■ सागर बिराजदार (लातूर) विरूद्ध अभिजित कटके (पुणे शहर)

माती विभाग

■ शैलेश शेळके (लातूर)विरूद्ध गणेश जगताप (हिंगोली)

■ बाला रफिक शेख (बुलढाणा) विरूद्ध ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे

महाराष्ट्र केसरी कुस्ती 2019-20 मधिल अंतिम सामना यंदा 7 जानेवारी दिवशी पुण्यात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 6 वाजता रंगेल. मागील वर्षी बाला रफिक शेख या बुलढाण्याच्या पैलवानाने विजेतेपद पटकावलं होतं.