Maharashtra Kesari 2019-20 Semi Final Live Streaming: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेमधील रंगतदार सामने इथे पहा लाईव्ह; बाला रफीक शेख, अभिजित कटके आज उतरणार मैदानात!
Maharashtra Kesari Kusti 2019-2020 | Photo Credits: Maharashtra State Wrestling Association Facebook Page

63rd Maharashtra Kesari Kusti Semi Final:  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज (6 जानेवारी) चौथा दिवस आहे. यंदा 63 व्या केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी मध्ये करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेचे सारे सामने विना तिकीट मोफत पाहण्याची सोय ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या युट्युब चॅनलवर या स्पर्धेतील सामने ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जर आज तुम्ही केसरी कुस्ती स्पर्धेतील सामने थेट स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकत नसाल तर तुम्ही युट्युबवरही घरबसल्या या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. Maharashtra Kesari Kusti 2019-20 Semi Final: महाराष्ट्र केसरी खुला गटातील माती आणि गादी विभागात पहा कुणामध्ये होणार सेमी फायनलचे सामने?

आज काही सामने सकाळच्या सत्रामध्ये तर काही सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणार आहेत. मग हे सामने लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आजच्या दिवसभरात कुणामध्ये रंगणार सामने?

१) पैलवान सचिन येलभर - (मुंबई उपनगर) विरूद्ध  पैलवान प्रविण सरक - (सातारा)

२) पैलवान हर्षवर्धन सदगिर (नाशिक जिल्हा) विरूद्ध पैलवान संग्राम पाटील (कोल्हापूर )

३) पैलवान आदर्श गुंड (पुणे जिल्हा ) विरूद्ध पैलवान सागर बिराजदार (लातूर)

४) पैलवान अभिजित कटके (पुणे शहर) विरूद्ध पैलवान अक्षय मंगवडे (सोलापूर)

■ गादी (मॅट) विभाग चौथी फेरी

१) पैलवान सचिन येलभर - (मुंबई उपनगर) विरूद्ध पैलवान प्रविण सरक - (सातारा)

२) पैलवान हर्षवर्धन सदगिर (नाशिक जिल्हा) विरूद्ध पैलवान संग्राम पाटील (कोल्हापूर )

३) पैलवान आदर्श गुंड (पुणे जिल्हा )विरूद्ध पैलवान सागर बिराजदार (लातूर)

४) पैलवान अभिजित कटके (पुणे शहर) विरूद्ध पैलवान अक्षय मंगवडे (सोलापूर)

■ माती विभाग चौथी फेरी

१) पैलवान संतोष दोरवड (रत्नागिरी ) विरूद्ध पैलवान शैलेश शेळके (लातुर )

२) पैलवान गणेश जगताप (हिंगोली) विरूद्ध पैलवान सिकंदर शेख (वाशीम)

३) पैलवान बाला रफीक शेख (बुलढाणा) विरूद्ध पैलवान तानाजी झुंजूरके (पुणे शहर )

४) पैलवान संदिप काळे (मुं. पूर्व ) विरूद्ध पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माउली जमदाडे (सोलापुर )

गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते. मागील वर्षी बाला रफिक यांनी विजेतेपद जिंकले होते.