Maharashtra Kesari 2019 -20 | Photo Credits: Facebook/ Maharashtra State Wrestling Association

 Maharashtra Kesari Kusti Final:  महाराष्ट्रातील पैलवानांसाठी प्रतिष्ठेची असणार्‍या 'महाराष्ट्र केसरी कुस्ती 2019-20' चा अंतिम सामना आज (7 जानेवारी) दिवशी रंगणार आहे. यंदाच्या 63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमधून गत विजेता बाला रफिक आणि उपविजेता अभिजित काटके दोघेही बाहेर पडल्याने हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होता. आज सायंकाळी पुण्यामध्ये रंगणार्‍या अंतिम सामन्यात नव्या पैलवानाच्या हातामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा जाणार आहे. दरम्यान हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके हे दोघेही अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार यांचे पठ्ठे आहेत. Maharashtra Kesari Final 2020 Live Streaming: कुस्तीवीर हर्षवर्धन सदगीर विरूद्ध शैलेश शेळके मध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' चा अंतिम सामना; इथे पहा लढतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग

माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेने गतविजेता बाला रफिक शेखला चितपट केले तर दुसऱ्या उपांत्य अटीतटीच्या लढतीत पैलवान शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगताप वरती विजय मिळवला. तर मॅट मध्ये चौथ्या फेरीत अभिजित काटकेने लातूरच्या सागर बिराजदार वरती विजय मिळवला. तर हर्षवर्धन सदगीर याने मुंबई उपनगरच्या सचिन येलभर वरती विजय संपादित केला. त्यानंतर गादी विभागात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने गतसालाचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटकेवर 5 विरुद्ध 2 अशा गुण फरकाने पराजित करत धक्कादायक निकालाची नोंद करत 'महाराष्ट्र केसरी' गदेसाठी अंतिम फेरीत धडक मारली. (Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते)

पुण्यामध्ये शिवछत्रपती क्रीडानगरी मध्ये भरवण्यात आले. या स्पर्धेचे सर्व सामने विना तिकिट मोफत पाहण्याची संधी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहे. आज थेट स्टेडियममध्ये बसून अंतिम सामना पाहण्यासाठीदेखील विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच घराबसल्या युट्युबवरदेखील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.