लियोनल मेस्सी याचे अनुकरण करतो त्याचा 4 वर्षाचा मुलगा Mateo, 'या' मनमोहक Video मध्ये केले आपल्या फुटबॉल टैलेंटचे प्रदर्शन
लियोनल मेस्सी (Photo Credit: AP/PTI)

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा फुटबॉल जगातील एक महान खेळाडू आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मेस्सी हे मागील काही दशकांपासून फुटबॉलमध्ये राज्य करत आहे. मेस्सीची प्रतिभा त्याच्या मुलांमध्येही आहे, ज्याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मेस्सीचा मुलगा मातेओ वडिलांच्या पावलांवर चालताना दिसत आहे. मेस्सीची पत्नी अँटोनेला रोक्कुझो यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे ज्यामध्ये मुलगा मातेओने त्याचे फुटबॉल कौशल्य दाखवले आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी प्रार्थना करतो की आपण आनंदी आणि प्रेमळ आहात, जे आपल्या आयुष्यात आनंद आणेल." (FIFA World Cup Qualifier: कतार संघाला बरोबरीत रोखत भारतीय फुटबॉल टीमने रचला इतिहास, गुरप्रीत सिंह संधूच्या झुंझार खेळीचं Twitter वर कौतुक)

मातेओ या व्हिडिओंमध्ये शानदार गोल करताना दिसत आहे. शिवाय आपल्या वडिलांसारख्या गोल झाल्यानंतर त्याच प्रकारे आनंद देखील साजरा करताना देखील पाहायला मिळतोय. पहा हा मनमोहक व्हिडिओ:

मेस्सीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवाती बार्सिलोनाबरोबर खेळताना केलीय. बार्सिलोनाकडून मेस्सीने 687 सामन्यात 603 गोल केले. या दरम्यान 251 गोलांना सहाय्य केले. त्याने संघासह 10 ला लीगा विजेतेपद जिंकले. मेस्सीने बार्सिलोनाला 4 वेळा चॅम्पियन्स लीग जिंकण्यास मदत केली. अलीकडेच बार्सिलोनाशी त्यांचा चार वर्षांचा करार संपल्यानंतर मेस्सी बार्सिलोना सोडतील असा अंदाज वर्तविला जात होता. पण याबाबत स्पष्टीकरण देताना मेस्सी म्हणाला की, "अलिकडच्या काळात बार्सिलोना सोडण्याची माझी कोणतीही योजना नाही. मला शक्य होईल तोपर्यंत मला बार्सिलोनामध्ये रहायचे आहे आणि मी येथे माझे करियर खेळू इच्छितो कारण ते माझे घर आहे."