FIFA World Cup Qualifier: कतार संघाला बरोबरीत रोखत भारतीय फुटबॉल टीमने रचला इतिहास, गुरप्रीत सिंह संधूच्या झुंझार खेळीचं Twitter वर कौतुक
(Photo Credit: Getty)

पहिल्या सामन्यात ओमानच्या हाती झालेल्या पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघाने (Indian Football Team) अनपेक्षित कामगिरी करत आशियाई चषक (AFC Asia Cup) विजेत्या कतार (Qatar) संघाला मंगळवारी फिफा (FIFA) विश्वचषकाच्या क्वालिफायर मॅचमध्ये बरोबरीत रोखले. जानेवारीत झालेल्या आशियाई चषक जिंकणाऱ्या कतारसारख्या बलाढ्य संघाला रोखणे सोपे नव्हते पण कर्णधार सुनील छेत्री शिवाय भारताने मजबूत बचावाच्या बळावर गोल होऊ दिले नाही. छेत्रीच्या अभावामुळे निःसंशयपणे संघाला आक्रमक परिस्थिती राहिली. तापामुळे छेत्री या सामन्यात खेळू शकला नाही. त्यांच्या जागी कर्णधार असलेल्या संदेश झिंगन (Sandesh Jhingan) याने आपली जबाबदारी चांगली पार पाडली आणि बचावात संघाला मोठे योगदान दिले. अगदी सुरुवातीपासूनच कतारने वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला आणि संधी निर्माण करत राहिल्या, परंतु भारतीय बचावाने त्यांच्यापासून सर्व प्रयत्न आवाक्याबाहेर ठेवले. गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधू (Gurpreet Singh Sandhu) संपूर्ण सामन्यात स्टार म्हणून चमकला आणि कतारने ग्रुप ई च्या सामन्यात एकही गोल करू दिला नाही.

फिफाच्या ताज्या क्रमवारीत 103 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने जागतिक क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर असलेल्या कतारला स्वत: च्या मैदानावर बरोबरीत रोखले. सध्याच्या वर्षात एएफसी आशिया कप विजेता संघाला बरोबरीत रोखणारा भारतीय संघ आशियातिल पहिला संघ बनला. यासह, भारतीय खेळाडूंचा असा खेळ पाहून सोशल मीडियावर चाहत्यांना विश्वास बसला नाही. सोशल मीडिया, ट्विटरवर चाहत्यांनी आपण काय पाहत आहो यावर अविश्वास व्यक्त केला आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. या मॅचमध्ये प्रेक्षक म्हणून असणाऱ्या कर्णधार सुनील छेत्री याच्यापासून अन्य चाहत्यांच्या काही उत्तम प्रतिक्रिया पुढे आहे:

प्रिय भारत, ती माझी टीम आहे

मॅन ऑफ द आवर

भारतीय फुटबॉलचा मोठा निकाल

आशियाई चॅम्पियन कतारवर भारताने 0-0 अशी केली मात

अलीकडच्या काळात हा भारताचा सर्वोत्तम निकाल आहे यात शंका नाही. यापूर्वी गुवाहाटी येथे 5 सप्टेंबरला भारताने ओमानला एका विरुद्ध दोन गोलांनी पराभूत केले होते. कतारशी झालेल्या सामन्यानंतर भारताकडे आता एक गुण आहे तर कतारने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला 6-0 ने पराभूत केल्याने त्यांचे चार गुण झाले आहेत. या दोन संघांमधील शेवटचा अधिकृत सामना सप्टेंबर 2007 मध्ये वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळला गेला होता ज्यामध्ये कतारने भारताचा 6-0 असा पराभव केला होता.