टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

Brisbane Olympics 2032: खेळ चाहत्यांमध्ये टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळांची उत्सुकता लागून असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) ब्रिस्बेनला (Brisbane) बुधवारी 2032 च्या ऑलिम्पिकचे यजमान म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणारे ऑस्ट्रेलियाचे (Australia) हे तिसरे शहर ठरले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न आणि सिडनी शहरात बहु-राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) मोठ्या पडद्यावर घोषणा करत ऑस्ट्रेलिया तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करणारा अमेरिकेनंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरला आहे. क्वीन्सलँड (Queensland) राज्याची राजधानी फेब्रुवारी महिन्यात निवडलेली निवडक यजमान होती आणि गेल्या महिन्यात त्याला कार्यकारी मंडळाची सहमती मिळाली.

इंडोनेशिया, हंगेरीची राजधानी बुडापेस्ट, चीन, कतारचा दोहा आणि जर्मनीचा रुहर खोरे प्रदेश यासह 2032 स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक शहर आणि देशांनी जाहीरपणे रस दाखवला होता. आयओसीने शहराच्या विद्यमान स्थळांची उच्च टक्केवारी, सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या सर्व स्तरांचे पाठबळ, मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा अनुभव आणि अनुकूल हवामान यासह इतर गोष्टींचे वारंवार कौतुक केले. ऑस्ट्रेलियन सरकारने एप्रिल महिन्यात पायाभूत सुविधांचे विभाजन करण्याच्या वचनबद्धतेमुळे क्विन्सलँडचे प्रीमियर अन्नास्तासिया पलास्झकुकला आवश्यक आर्थिक हमी IOC कडे पाठवण्याची परवानगी दिली होती. क्वीन्सलँडने यापूर्वी 2018 राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या गोल्ड कोस्टसह क्वीन्सलँड राज्यात ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल. लोकप्रिय 2000 सिडनी ऑलिम्पिकनंतर 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खेळांचे आयोजन केले जाणार आहे. मेलबर्नने 1956 मध्ये खेळांचे आयोजन केले होते.

दरम्यान, टोकियो या आठवड्यात स्थगित 2020 ऑलिम्पिकचे आयोजन करीत आहे आणि पॅरिस येथे 2024 स्पर्धा होणार आहेत. लॉस एंजेलिसला 2028 ग्रीष्मकालीन ऑलिंपिक खेळाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.