Asian Champions Trophy 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुधवारी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) सामना होणार आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर रात्री साडेआठपासून हा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकीतील वैर क्रिकेटइतकेच जुने आहे. 1956 च्या ऑलिम्पिकमध्ये दोन्ही संघांची पहिली गाठ पडली होती. यामध्ये भारताने 1-0 असा विजय मिळवला. शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा सामना 1-1 असा बरोबरीत संपला. सामन्याचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले की, उपांत्य फेरीत स्थान निश्चित केल्यानंतर ते आणि त्यांचा संघ पाकिस्तानचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. याआधी सोमवारी, पाकिस्तानने चीनला 2-1 ने पराभूत केल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक मुहम्मद सकलेनने इशारा दिला की भारताच्या कमकुवतपणाची जाणीव आहे.
कधी आणि कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 सामना चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच हा तुम्ही सामना फॅनकोड मोबाइल अॅपवर थेट प्रवाहित केला जाईल. (हे देखील वाचा: India Beat Malaysia: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये भारती हॉकी संघाचा विजय, मलेशियाचा 5-0 असा केला पराभव)
उपांत्य फेरीतील भारताचे स्थान झाले पक्के
भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आधीच मजल मारली आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा पहिला सामना मलेशियाविरुद्ध 3-1 असा पराभव झाला. पाकिस्तानचा पहिला विजय चीनविरुद्ध झाला. संघाने चीनचा 2-1 असा पराभव केला. जर जपानने आदल्या दिवशी चीनला पराभूत केले तर उपांत्य फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय किंवा ड्रॉ आवश्यक असेल.