भारतीय फुटबॉल (Photo Credit: Facebook)

2022 मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रतेच्या शर्यतीत टिकण्यासाठी धडपडत असलेला भारतीय संघ (Indian Team) त्याच्या घरातील उच्चपदस्थ ओमान (Oman) संघाशी सामना करेल. हा सामना टीम इंडियासाठो करो-या-मरोचा आहे. भारतीय संघाने विश्वचषक पात्रता फेरीत चार सामने खेळले आहेत. यातील तीन अनिर्णित, तर एकमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे फिफा विश्वचषक पात्रता फेरीत सुनील छेत्री आणि संघाचा रस्ता खूप कठीण झाला आहे. फिफा (FIFA) क्रमवारीत ओमान 84 व्या स्थानावर आणि भारत 110 व्या स्थानावर आहे. भारत आणि ओमान ई गटात आहेत. या गटातील या दोन संघांमधील ही दुसरी मॅच असेल. 5 सप्टेंबर रोजी ओमानने गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 2-1 असा पराभव केला होता. 14 नोव्हेंबरला बांगलादेशवर जोरदार विजयानंतर ओमान संघ पूर्ण आत्मविश्वासाने या सामन्यात उतरेल, तर भारतीय संघ या मॅचमध्ये संघर्ष करत आहे.

पुढील फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला मंगळवारी उच्चपदस्थ ओमान विरुद्ध विजय आवश्यक आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारतीय संघाचे फिफा विश्वचषक फेरी गाठण्याच्या सर्व आशा संपुष्टात येतील. ओमानविरुद्ध झालेल्या आठ सामन्यांपैकी भारतीय संघाने फक्त एक सामना जिंकला आहे. भारत आणि ओमान संघातील हा सामना आज रात्री 8.30 भारतीय वेळेनुसार सेंट्रल रिपब्लिकन स्टेडियम, दुशान्बेमध्ये सुरु होईल. भारत आणि ओमानमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स 1 आणि 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2 आणि 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी आणि हिंदी एचडी वर प्रसारित होईल. शिवाय हॉटस्टारवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहता येईल.

ग्रुप ई मध्ये तीन गुणांसह भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. चार सामन्यांमध्ये नऊ गुणांसह ओमान दुसर्‍या स्थानावर आहे. कतार दहा गुणांसह अव्वल स्थानी आहे. ओमान विरुद्ध कमीतकमी एक गुण मिळवणे भारताला महत्वाचे ठरेल. या सामन्यातील एक गुण भारताला आशियाई चषक 2023 च्या पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविणे सुलभ होईल.