BWF World Championship: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता गारद, एचएस प्रणॉय याची दुसऱ्या फेरीत माजी चॅम्पियन लिन डॅन याच्यावर मात
एचएस प्रणॉय (Photo Credit: BAI Media/ Twitter)

मंगळवारी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पुरूष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Prannoy) याने बॅडमिंटनचा दिग्गज लीन डॅन (Lin Dan) याचा पराभव केला. प्रणॉयने सलग तीन गेममधे डॅनचा पराभव केला. प्रणॉयने पहिला गेम 21-11 ने जिंकला पण डॅनने दुसर्‍या गेममध्ये दमदार पुनरागमन केले आणि 13-21 असा विजय मिळविला. पण, प्रणॉयने निर्णायक गेममधे त्याचा सर्वोत्तम खेळ केला आणि डॅनला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. प्रणॉयने 21-7 सामना जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन कारकिर्दीतील लिन डॅनवरचा प्रणॉयचा हा फक्त तिसरा विजय होता. डॅन हा माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहे.

प्रणॉयने 62 मिनिटांच्या संघर्षानंतर 11 व्या मानांकित डॅनचा 21-11, 13-21, 21-7 ने पराभव केला. आकडेवारी बघितल्यास असे दिसते की प्रणॉयला जास्त घाम घ्यावा लागला नाही. पण ऑलिम्पिक पदकविजेते डॅनसमोर हा सामना जिंकणे हे आपल्यातच एक मोठी उपलब्धी आहे. याआधी त्याने 2018 इंडोनेशिया ओपन आणि 2015 फ्रेंच ओपनमध्येही चिनी शटलरचा पराभव केला आहे. जर आपण दोघांमधील आकडेवारी पाहिली तर प्रणय 3-2 ने आघाडीवर आहे. प्रणॉयने पहिल्या सामन्यापासूनच आपली पकड मजबूत राखत सामन्यात धमाकेदार खेळी केली. मात्र, दुसर्‍या गेममध्ये डॅनने चांगले पुनरागमन केले आणि खेळात रोमांचज निर्माण केला.