Hockey World Cup 2018 : हॉकी वर्ल्ड कप जिंकल्याचं भारतीय पुरूष संघाचं स्वप्न भंगलं आहे. गुरुवारी कलिंगा स्टेडियमवर नेदरलॅंड (Netherlands) विरूद्ध भारताचा (India) सामना रंगला. या सामन्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नेदरलॅन्डने भारतावर 2-1 अशी मात केली आहे. त्यामुळे 43 वर्षांपासून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या भारतीय संघाच्या स्वप्नाला तडा गेला आहे.
भारताकडून आकाशदीप सिंह या खेळाडूने केवळ एक गोल केला. हा गोल करून भारताने आघाडी मिळवली मात्र सामन्यावर वर्चस्व ठेवता आले नाही. अनेकदा भारतीय संघाची गोल करण्याची संधी खेळामध्ये हुकली. नेदरलॅंडकडून थिएरी ब्रिंकमान आणि मिंक वान देर वीर्डन या खेळाडूंनी गोल केला.
नेदर्लॅड तीन वेळेस चॅम्पियन ठरली आहे. आता 15 डिसेंबरला ऑस्ट्रेलिया विरूद्ध नेदरलॅडचा सामना होईल. त्यापूर्वी सेमीफायनलमध्ये बेल्जियम आणि इंग्लड संघामध्ये लढत होईल.