फुटबॉलर Cristiano Ronaldo ने रचला इतिहास; ठरला Instagram वर 300 मिलिअन फॉलोअर्स झालेली जगातील पहिली व्यक्ती
Cristiano Ronaldo (Photo Credits: Twitter)

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) मैदानाबाहेर इतिहास रचला आहे. रोनाल्डोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) 300 दशलक्ष म्हणजेच 30 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. असे करणारा तो जगातील पहिली व्यक्ती ठरला आहे. याआधीही रोनाल्डो इंस्टावर 200 दशलक्ष म्हणजेच 20 कोटींचा आकडा गाठणारी पहिली व्यक्ती ठरला होता. त्यानंतर ड्वेन 'द रॉक' जॉन्सन दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर ड्वेनचे 246 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 36 वर्षीय रोनाल्डो 106 गोलांसह देशातील सर्वोच्च धावा करणारा खेळाडू आहे.

पोर्तुगीज सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो युरोपियन चँपियनशिपमध्ये पत्रकार परिषदेत टेबलवरून कोका-कोलाची बाटली काढून टाकल्याने चर्चेत आला होता. रोनाल्डो फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे आणि त्याने यापूर्वीही कार्बोनेटेड पेयेबाबत भाष्य केले आहे. सोमवारी पोर्तुगालच्या हंगेरीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्याने समोर ठेवलेल्या दोन कोका-कोला ग्लासच्या बाटल्या काढून टाकल्या व पाण्याची बाटली घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

या घटनेनंतर कोका-कोला कंपनीचे 30 हजार कोटींचे नुकसान झाले. मीडिया रिपोर्टनुसार युरो 2020 च्या अधिकृत प्रायोजकांपैकी एक असलेल्या कोका-कोलाची शेअर्स किंमत 56.10 डॉलरवरून घसरून 55.22 डॉलरवर गेली. कोका-कोला युरो 2020 च्या अधिकृत प्रायोजकांपैकी एक आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोका-कोला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रत्येकला आपल्या आवडीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार स्वत: चे पेय निवडण्याचा अधिकार आहे.’

(हेही वाचा: Cristiano Ronaldo याच्या 'त्या' कृतीमुळे Coca Cola कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा जबर फटका, Euro 2020 स्पर्धेतील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

गेल्या वर्षी एका अहवालानुसार रोनाल्डो इन्स्टाग्रामद्वारे सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी आहे. मार्च 2019 ते मार्च 2020 पर्यंत रोनाल्डोने इन्स्टाग्रामद्वारे $50.3 मिलिअन कमावले, जे आपल्या फुटबॉल क्लब जुव्हेंटसकडून मिळालेल्या पगारापेक्षा ($33m) जास्त आहे. 2021 मध्ये रोनाल्डो सर्वाधिक कमाई कमाई करणारा खेळाडू ठरला होता. त्याने एकूण 120 मिलियन डॉलर्सची कमाई केली. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकूण त्याचे 500 मिलिअन हून अधिक फॉलोअर्स आहेत.