Tokyo Olympics 2020: यंदाच्या ऑलिंपिक गेम्स च्या सुरूवातीला गूगलने  डूडल चॅम्पियंस आयलंड गेम्स सुरू करत  दिल्या शुभेच्छा
Google Doodle | PC: Google Home Page

Tokyo Olympics 2020 ची आजपासून धूम सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर गूगल ने आपल्या डूडलच्या माध्यमातून खास अ‍ॅनिमेटेड गेम लॉन्च केला आहे. आज डूडल वर Champion Island Games सुरू करण्यात आला आहे. टेबल टेनिस, स्केटबोर्डिंग, आर्चरी (धनुर्विद्या), रब्बी, स्विमिंग, क्लाईमिंग आणि मॅरोथॉन या खेळांचा गूगल डूडल पेज वर समावेश करण्यात आला आहे. या सात मिनी गेम्स सोबतच काही महान प्रति स्पर्धक अनेक स्पर्धा आहेत. युजर्स रिअल टाईम मध्ये निंजा कॅट गेम खेळू शकणार आहेत. युजर 4 टीम मध्ये आहेत. त्यात ब्लू, रेड, ग्रीन, यलो अशा चार टीम्स आहेत.

दरम्यान आजच्या गूगल डूडल वरचे अ‍ॅनिमेशन हे टोकियो मधील एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओ मध्ये करण्यात आले आहेत. तसेच हे अ‍ॅनिमेशन युजर्सना आनंद देणारे असेल असा विश्वास युजर्सने व्यक्त केला आहे. यामध्ये मिनी गेम पूर्ण करणार्‍यांना आनंद देण्यासाठी फूलांचा आणि dangos (three colour dumplings)यांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे जगभरात आनंद पसरवता येईल असं त्यांचं मत आहे. नक्की वाचा: Tokyo Olympics 2020 Athletes in 3D: PV Sindhu, Simone Biles’ सह निवडक ऑलंपिक खेळाडूंना त्यांच्या स्किल मध्ये 3D With Google AR मध्ये कसं पहाल?

कोरोना संकटामुळे ऑलिंपिक गेम्स यंदा वर्षभर पुढे ढकलले गेले आहेत. आज वर्षभराने ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामध्ये भारतासह जगभरातील स्पर्धक सहभागी होत आहेत. भारताकडून 120 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. अधिकारी, सपोर्ट टीम्स आणि कोच मिळून जपान मध्ये यंदा 228 जणांची टीम पाठवण्यात आली आहे.