Khabib Nurmagomedov Slams French President (Photo Credits: Instagram)

खबीब नूरमागोमेदोव (Khabib Nurmagomedov) हा युफएसीचा लाईटवेट (UFC LightWeight) आणि अजिंक्य असा चॅम्पियन आहे. Republic of Dagestan मधून खबीब आपल्या मुस्लिम धर्माचे पालन करतो. मागील आठवड्यातच त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यामध्ये खबीबने Justin Gaethje याला युएफसीच्या 254 व्या मुख्य सामन्यात हरवत आपल्या करियरमधील 29 वा विजय मिळवला. आतापर्यंत एकही सामना न हरलेल्या खबीब चे युएफसी मधील करियर 29-0 असे आहे. सध्या खबीब त्याच्या इंस्टग्राम पोस्टमुळे चर्तेत आला आहे. या पोस्टमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनी इस्लाम (Islam) धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यासाठी केलेल्या इंस्टा पोस्टमध्ये त्याने लिहिले, "अल्लाह इमॅन्युएल च्या चेहऱ्याची दुर्दशा करो." (Khabib Nurmagomedov Retires: यूएफसी चॅम्पियन खाबीब ‘द ईगल’ नूरमगोमेदोव बद्दल 'या' 7 माहित नसलेल्या गोष्टी ऐकून व्हाल चकित)

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामवर केलेल्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी खबीब याने ही पोस्ट केली आहे. फ्रान्स अध्यक्षांच्या इस्लामवरील वक्तव्यामुळे जगभरातील इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. काही इस्लामिक देशांनी फ्रान्स वरुन येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शमुवेल पॅटीच्या अंत्यसंस्कारादरम्यान इस्लाम धर्माची निंदा करणाऱ्या स्केचला इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दुजोरा दिला. आणि इस्लाम धर्म संकटात असल्याचे वादग्रस्त विधान केले. दरम्यान, याचे पडसाद संपूर्ण जगभरातील मुस्लिम देशांत उमटले आहेत.

पहा पोस्ट:

View this post on Instagram

Да обезобразит Всевышний лицо этой твари и всех его последователей, которые под лозунгом свободы слова оскорбляют чувства более полутора миллиарда верующих мусульман. Да унизит их Всевышний в этой жизни, и в следующей. Аллах скор в расчёте и вы это увидите. Мы - мусульмане, любим нашего Пророка Мухаммада (да благословит его Аллах и приветствует) больше, чем наших матерей, отцов, детей, жён и всех остальных близких нашему сердцу людей. Поверьте мне, эти провокации им выйдут боком, конец всегда за Богобоязненными. - ‎قبح الله وجه هذا الأبتر وجميع تبعهم الذين يؤذون الشعور أكثر من نصف مليار مسلم تحت قناع الحرية ‎أذلهم الله في الدنيا والآخرة إن الله سريع الحساب ‎نحن مسلمون نحب رسولنا ونبينا محمد صلى الله عليه وسلم أكثر من أمهاتنا وآبائنا وأبنائنا وأزواجنا ومن جميع خلق الله سبحانه وتعالى ‎صدّقوني هذه الاستفزازات سوف تخرج من أعناقهم والعاقبة للمتقين - Holy Quran 33:57 ------------------ إِنَّ الَّذِينَ يُؤْذُونَ اللَّهَ وَرَسُولَهُ لَعَنَهُمُ اللَّهُ فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ وَأَعَدَّ لَهُمْ عَذَابًا مُّهِينًا Воистину, тех, которые поносят Аллаха и Его Посланника, Аллах проклял в этом мире и в Последней жизни и уготовил им унизительные мучения.

A post shared by Khabib Nurmagomedov (@khabib_nurmagomedov) on

खबीब नूरमागोमेदोव हा 'The Eagle' या नावाने युएफसीच्या जगतात प्रसिद्ध आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन च्या चेहऱ्यावर बुटांचे ठसे असलेला फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत खबीबने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, फ्रेंच अध्यक्ष आणि त्यांचे अनुयायी यांच्या चेहऱ्याची अल्लाह दुर्दशा करो. यापुढे युएफसी फायटरने असे लिहिले की, "इस्लाम धर्माची निंदा करणाऱ्यांना अल्लाह माफ करणार नाही आणि लवकरच त्यांना त्याची शिक्षा सुद्धा मिळेल."