33rd Pune International Marathon : इथिओपियाच्या खेळाडूने मारली बाजी !
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (प्रातिनिधिक फोटो) Photo Credit: Pixabay

33rd Pune International Marathon : पुणेकरांसाठी आज ( 2 डिसेंबर) ची सकाळ खास होती. आज पुण्यात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे मॅरेथॉन स्पर्धेमध्येही आफ्रिकन खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं. आज सकाळी उत्साहात पार पडलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये इथिओपियाच्या (Ethiopian Runner )अटलाव डेबेड या खेळाडूने माजी मारली.सुमारे 42 किलो मीटरची फुल मॅरॅथॉन त्याने जिंकली.

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये एकूण पंधरा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर यामध्ये 102 परदेशी स्पर्धक होते. पुण्यात सारसबाग परिसरात बाबुराव सणस मैदानापासून ही मॅरेथॉन सुरु झाली. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते मॅरेथॉन सुरु करण्यात आली.

फुल मॅरेथॉन (42 किमी), अर्धमॅरेथॉन (21 किमी), 5 आणि 10 किलोमीटर शर्यत, व्हिलचेअर शर्यत, प्रल्हाद सावंत चॅरिटी रन तसेच 14 आणि 16 वर्षांखालील मुलां-मुलींच्या शर्यती अशा विविध स्वरूपात त्याच आयोजन करण्यात आलं होतं. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये एकूण 30 लाखाची बक्षिसं होती.

 

View this post on Instagram

 

33rd PUNE INTERNATIONAL MARATHON 2018 ZUMBA SESSION✌️😎

A post shared by PUNE INTERNATIONAL MARATHON (@puneinternational) on

पुणे मॅरेथॉनमध्ये यंदा खास झुंबा सेशनचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.