Chuni Goswami (Photo Credits: Twitter/@IndianFootball)

भारताचे सुप्रसिद्ध माजी फुटबॉल कर्णधार आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू चुन्नी गोस्वामी (Chuni Goswami)  यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोलकाता येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा सुदिप्तो असा परिवार आहे. चुन्नी गोस्वामी हे 1960 मध्ये अशियायी स्पर्धांमध्ये सूवर्ण पदक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार राहिले आहेत. तसेच पश्चिम बंगालसाठी त्यांनी प्रथम श्रेणीत क्रिकेटही खेळले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरवले आहे.

चुन्नी गोस्वामी यांच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चुन्नी गोस्वामी यांचे निधन हृदयविकाराचा झटका आल्याने झाला. सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. प्रदीर्घ काळापासून गोस्वामी हे मधुमेह, पोस्ट्रेट आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते. (हेही वाचा, Rishi Kapoor Dies: अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; अमिताभ बच्चन यांंनी ट्वीट करत शेअर केली दु:खद बातमी)

पीटीआय ट्विट

चुन्नी गोस्वामी यांची कारकीर्द

चुन्नी गोस्वामी यांनी भारतासाठी फुटबॉल खेळाडू म्हणून 1956 ते 1964 या काळात योगदान दिले. या काळात त्यांनी 50 सामने खेळले. तर एक क्रिकेटपटू म्हणून त्यांनी 1962 ते 1973 हा काळ गाजवला. या काळात त्यांनी 46 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. या सामन्यांमधून त्यांनी पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व केले.