मृत ऑस्ट्रेलियन स्नोबोर्ड विजेता अॅलेक्स पुलिनच्या (Alex Pullin) गर्लफ्रेंडने ऑलिम्पियनच्या (Olympian) मृत्यूच्या 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर गर्भवती असल्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एलेक्सची प्रेयसी Ellidy ने आपले फोटोशूटचे फोटोज शेअर करून ही गोड बातमी शेअर केली. याबाबत विशेष म्हणजे Ellidy ने हिवाळी ऑलिम्पियन अॅलेक्स पुलिनच्या मृत्यूनंतर मूल होण्याची इच्छा व्यक्त करत डॉक्टरांना अॅलेक्सच्या शरीरातून शुक्राणू (Sperm) काढण्यास सांगितले आणि त्यानंतर एका वर्षानंतर तिने तिच्या आणि अॅलेक्स पुलिनच्या मुलाला जन्म देणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तीन वेळा हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा आणि वर्ल्ड स्नोबोर्ड चॅम्पियनचे 3 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या एलेक्सचा जुलै 2020 मध्ये एका अपघातात मृत्यू झाला होता. एलेक्स आणि एलीडे गेल्या आठ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने ऑक्टोबरमध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचं सांगितलं आणि हे देखील उघडकीस केले की हे जोडपं अनेक वर्षांपासून बाळाचे स्वप्न पाहत होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजमध्ये तिने बी बंपही दाखवले. Ellidy ने इंस्टाग्रामवर एक पोस्ट तिच्या गरोदर राहण्याबद्दल सांगितले की, “आमचे बाळ ऑक्टोबरमध्ये येणार आहे. मी आणि अलेक्स गेल्या काही वर्षांपासून बाळासाठी तयारी करत होतो. माझ्यासाठी हा एक अतिशय आव्हानात्मक टप्पा होता. परंतु आता मी यातून सावरत आहे.” तिने पुढे सांगितले की, “अॅलेक्सच्या मृत्यूआधी मी गरोदर राहावे अशी आमची इच्छा होती. बर्याच दिवसांपासून आम्ही मुलाच्या जन्माचे नियोजन करतच होतो. त्यासाठी आम्ही IVF तंत्राचाही विचार करत होतो. पण सर्व काही एकटे करावे लागेल याचा कधी विचार केला नाही.”
View this post on Instagram
The Sun मधील वृत्तानुसार, 2020 मध्ये ऑलिम्पियन अॅलेक्स पुलिनचा एका अपघातात मृत्यू झाला. ज्यानंतर त्याच्या प्रेयसीने अॅलेक्सच्या मृत्यूच्या 24 तासानंतर शुक्राणू गोळा केले आणि आता ती अॅलेक्सच्या मुलाची आई होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड (Queensland) शहराच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 36 तासांत शुक्राणू काढता येतात.