CWG 2022: भारतीय कुस्तीपटूंची कमाल; दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्यं पदकाची कमाई!
Commonwealth Games

कॉमनवेल्थ गेम्सचा (Commonwealth Games 2022) आठवा दिवस भारतीय कुस्ती पटूंनी आपल्या नावी नोंदवला आहे. कूस्तीमध्ये भारताने एक दोन नाही तर चक्क 6 पदकांची कमाई केली आहे.  यामध्ये तीन सुवर्णपदकांसह (Gold Medal) एक रौप्य पदक (Silver Medal) आणि दोन कांस्य पदकांचा (Bronze Medal) समावेश आहे. भारतीय खेळाडूंनी (Indian Players) दमदार खेळ दाखवत सहा पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहेत. यावर्षी भारताने (India) एकूण पटकावलेल्या पदकांची संख्या आता 26 वर गेली आहे.

 

कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia), दीपक पुनिया (Deepak Punia) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर महिला 57 किलो वजनी गटात कुस्तीपटू अंशू मलिकने  (Anshu Malik) रौप्य पदक आपल्या नावी नोंदवलं. एवढचं नाही तर भारताने कुस्तीमध्ये दोन कास्यपदकांची कमाई देखील केली आहे. दिव्या काकरन (Divya Kakran) आणि मोहित ग्रेवाल (Mohit Grewal) हे दोघं कास्य पदकाचे मानकरी ठरले आहेत.पदकाच्या कमाई नंतर कुस्तीपटू अंशू मलिक हिने पंतप्रधान मोदींचे (PM Modi) विशेष आभार मानले. तर सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया यांनी सगळ्याचे आभार मानत आता पुढील लक्ष ऑलिम्पिक्स (Olympics) 2024 असुन मी तयारीला सुरुवात केली आहे अशी प्रतिक्रीया दिली. तर कुस्तीपटू साक्षी मलिक पदकाची मानकरी ठरली त्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंद अश्रू बघायला मिळाले. तसेच कांस्यपदक विजेती दिव्या काकरने कास्यपदकाची कमाई केल्याने जरा नाराजी व्यक्त केली असली तरी पुढल्या वेळी नक्कीच सुवर्णपदक पटकावेन अशी प्रतिकीया दिली आहे.

 

यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या अप्रतिम कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनीही विशेष कामगिरी बघायला मिळाली. भारताच्या सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली असुन पुढील काही दिवसात भारताच्या पदसंख्येत नक्कीच मोठी वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.