Jay Shah (Photo Credit - Twitter)

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा (Paris Olympic Games) सुरू होण्यासाठी आता सात दिवस बाकी आहेत. भारताने आगामी स्पर्धेसाठी 117 खेळाडूंचा संघ पाठवला आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे की, 'मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या अतुलनीय खेळाडूंना BCCI पाठिंबा देईल. आम्ही मोहिमेसाठी IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत. आमच्या संपूर्ण टीमला, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.' (हेही वाचा -BCCI On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासाठी बीसीसीआयचा नवा 'आदेश', आता त्याला द्यावी लागणार विशेष परीक्षा)

शहा यांचे ट्विट -

यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 70 पुरुष आणि 47 महिलांसह एकूण 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 26 जुलै रोजी होणार आहे. भारत 25 जुलै रोजी वैयक्तिक तिरंदाजी रँकिंग फेरीसह ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात करेल. (हेही वाचा: Rohit Sharma Milestone: रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला कर्णधार)

भारताच्या ॲथलेटिक्स संघामध्ये 29 खेळाडूंचा सहभाग आहे. सध्याचा जेव्हलिन चॅम्पियन नीरज चोप्रा या संघाचे नेतृत्व करेल. ज्यात किशोर जेना, अविनाश साबळे आणि अन्नू राणी या खेळाडूंचा समावेश आहे.