राफेल नदाल (Photo Credit: Pixabay)

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2020 च्या आयोजनकांनी एकूण बक्षीस रकमेची मोठी रक्कम जाहीर केली असून एकूण रक्कम ऑस्ट्रेलियन पैशांत 71 दशलक्षपर्यंत नेली आहे. 2019 च्या आवृत्तीत देण्यात आलेल्या प्राईस मनीमध्ये यंदा 13.6 टक्के वाढ करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे संचालक क्रेग टिल्ली (Craig Tiley) यांनी ही माहिती दिली. पुढील वर्षी 20 जानेवारीपासून मेलबर्न (Melbourne) येथे ही स्पर्धा खेळली जाईल. ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांच्या वतीने असे सांगण्यात आले आह की या वेळी या स्पर्धेत एकूण 710 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजयी खेळाडूला 250 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची रक्कम दिली गेली होती. पुरुष व महिला एकेरीचे जेतेपद जिंकणार्‍या खेळाडूंना सुमारे 29.18-29.18 कोटी दिले जातील. हे मागील वर्षाच्या तुलनेत 13.6% जास्त आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरी चॅम्पियनला मिळणारी रक्कम आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पॅट कमिन्सच्या दुप्पट असेल. कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 15.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला सुमारे 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर मिळतील. म्हणजेच या स्पर्धेत खेळणारा किंवा मुख्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या एखाद्या खेळाडूला किमान 9.85 लाख रुपये मिळतील.

वर्ष 2019 यामध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आणि जपानची नाओमी ओसाका (Naomi Osaka) यांनी पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. दुसरीकडे, यंदा दरवर्षीप्रमाणे सर्वांचे लक्ष अमेरिकेची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सन कडे असणार आहे. सेरेना यंदा तरी 24 वे ग्रँड स्लॅम जिंकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. शिवाय, मॅगी वर्षीचा विजेता नोवाकने एटीपी रँकिंगमधील अव्वल स्थान गमावले आहे. यूएस ओपनमध्ये झालेल्या पराभवानंतर जोकोविचची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे, तर स्पेनच्या राफेल नदाल ने वर्षखेरीस अव्वल स्थान मिळवले आहे.