2027 मध्ये एएफसी आशियाई चषक (AFC Asian Cup) स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताने अधिकृत बोली लगावली आहेत. राष्ट्रीय महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी याची खातरजमा केली. जर भारतीयाने (India) बिड जिंकली तर आशिया खंडात पहिल्यांदा या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. अलीकडे, कोविड-19 (COVID-19) चा धोका लक्षात घेता एएफसीने यजमान पदासाठी बोली लागवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत, 31 मार्च ते 30 जून, वाढविली दिली होती.2019 मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत कतारने जेतेपद जिंकले होते. एएफसी पुढील वर्षाच्या सुरूवातीस यजमान देशाची घोषणा करेल. एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही आपला दावा एएफसीकडे(एशियन फुटबॉल फेडरेशन) आधीच सादर केला आहे. आता या सर्व गोष्टींची गरज आहे." भारताव्यतिरिक्त आतापर्यंत सौदी अरेबियाने 2027 मध्ये आशियाई चषक आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली, परंतु या स्पर्धेचे कधीही आयोजन केले नाही.
यापूर्वी भारताने 2023 एएफसी एशिया कप आयोजित करण्याचा दावा केला होता, परंतु ऑक्टोबर 2018 मधील शर्यतीतून माघार घेतली. त्यानंतर, थायलंड आणि दक्षिण कोरियानेही हे नाव मागे घेतले, त्यानंतर चीनला यजमानपद मिळाले. दरम्यान, 2023 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणारा दक्षिण कोरिया देखील पुरुषांच्या 2027 एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी बोलीत सामील होण्याची शक्यता आहे. चीन 2023 मधील स्पर्धेचे आयोजन 10 शहरांत करणार आहे.
2017 मध्ये पुरुषांच्या अंडर-17 र्ल्डकपचे यशस्वीरित्या आयोजन केल्यापासून भारत या नोव्हेंबरमध्ये अंडर-17 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करणार होते परंतु कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पडूहील तारखांची पुढे ढकलण्यात आली आहे. 2022 च्या महिला एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी भारताला यजमानपद देण्यात आले आहेत. एएफसी आशियाई चषकात भारताने चार वेळा भाग घेतला आहे. भारताने 1964 च्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. त्यानंतर भारतीय संघ 1984, 2011 आणि 2019 मध्ये ग्रुप स्टेजच्या पुढे जाऊ शकला नाही.