AB de Villiers On Virat Kohli Retirement: भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार, अष्ठपैली खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीविलीयर्स (AB de Villiers)याने याबाबत वक्तव्य केले असून ते गांभीर्याने घेतले जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप 2023 (ICC ODI World Cup 2023) जर भारताने जिंकला तर कोहली आपल्या आवडत्या चेंडूफळीपासून म्हणजेच बॅट, बॉलपासून फारकत घेऊ शकतो.
डीविलियर्स याने म्हटले आह की, कोहलीसाठी टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांना निरोप देणे हा एक योग्य क्षण असेल. ज्यामुळे त्याचे लक्ष आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळण्याकड एधिक वळवले जाईल. दरम्यान, त्याने आपली तंदुस्ती कायम ठेवली तर तो आपला खेळ एखदिवसीय सामन्यांतही आणखी दाखवू शकतो, असे तो म्हणाला. मला माहिती आहे की, कोहलीला दक्षिण अफ्रीकेची टूर अधिक आवडते. पण, हे सांगणे कठीण आहे कारण अद्याप बराच वेळ बाकी आहे. मला वाटते की, त्याने जर विश्वचषक जिंकला तर खूप खूप धन्यवाद म्हणण्याची वेळ चुकीची असणार नाही. तसेच, मी पुढचे काही वर्षे टेस्ट क्रिकट खेळेण त्यानंतर थोडे आयपीेल खेळेन आणि आपल्या करिअरचा अंतिम टप्प्याचा आनंद घेईन, असेही तो सांगू शकतो.
व्हिडिओ
विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक (49) शतके ठोकण्याच्या सचिन तेंडूलकर यांचा विक्रम मोडण्याच्या जवळपास पोहोचला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतके झळकावणारा पहिला खेळाडू बनला आहे. तथापि, डिव्हिलियर्स म्हणाला की ही कामगिरी कोहलीसीठी तितकी महत्त्वाची नाही आणि संघासाठी विश्वचषक जिंकण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असल्याचा दावा केला.