रशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान धक्कादायक घटना पाहायला मिळाली. मैदानावर फुटबॉल सराव करत असताना खेळाडूवर वीज कोसळली. वीज थेट फुटबॉलपटूवर पडली, ज्यामुळे तो शेतात बेशुद्ध पडला. 16 वर्षीय इवान जोबोरोवोस्की (Ivan Zaborovsky), असे या फुटबॉलरचे नाव सांगण्यात आले आहे. इवानने आपल्या गळ्यात सोन्याची साखळी घातली होती, ज्यामुळे त्याचा जीव वाचला असे म्हटले जात आहे. सध्याच्या माहितीनुसार इवानची स्थिती आता स्थिर आहे. दरम्यान, काळजात धडकी भरवणारी ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ रशियाच्या मॉस्को (Moscow) येथील आहे. एफसी जनाम्या तरुडाची (FC Znamya Truda) टीम सराव करत असताना आकाशातून इवानवर वीज कोसळली. त्यानंतर टीमचे प्रशिक्षक एंटन बसोव या युवा गोलकीपरकडे धावले.
इवान त्याच्या पोटावर पडला होता आणि कोचने जेहवा त्याला पालटले तेव्हा त्याची जर्सी जळाली होती. त्यानंतर प्रशिक्षकाने त्याला प्रथमोपचार दिला आणि त्यानंतर इवानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 4 जुलै रोजी झाली आणि याच्या तीन आढवड्यानंतर इवान आता फुटबॉल मैदानावर परतला आहे. पाहा धडकी भरवणारा हा व्हिडिओ:
Russian teenage goalkeeper Ivan Zaborovsky returned to the pitch after he was struck by a bolt of lightning https://t.co/bTeoubsReg pic.twitter.com/xTy776Wx4v
— Reuters (@Reuters) July 22, 2020
या घटनेबद्दल बोलताना इवानने म्हटले की त्याला जास्त लक्षात नाही कारण वीज कोसळल्यावर तो बेशुद्ध झाला होता. इवान म्हणाला की, "मला आठवते की अचानक साखळी जिथे होती तेथे त्याच्या छातीच्या भागावर वीज पडली." दुसरीकडे, चकित करणारी बाब म्हणजे वीज पडल्यावरही त्याच्या गळ्यातील साखळीला काही झाले नाही. इवान म्हणाला,"मी पहिल्यापासून चांगला आहे आणि सर्व गोष्टी हळूहळू सामान्य होत आहेत."