Wimbledon 2022: नोव्हाक जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल खेळण्याचा रॉजर फेडररचा मोडला विक्रम
नोवाक जोकोविच (Photo Credit: Facebook)

विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत (Wimbledon 2022) नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीचा (Cameron Norie) पराभव करून अंतिम फेरी गाठली. या विजयासह जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल खेळण्याचा रॉजर फेडररचा (Roger Federer) विक्रम मोडला आहे. जोकोविच आता 32व्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये उतरणार आहे. रॉजर फेडरर 31 वेळा आणि राफेल नदाल 30 वेळा ग्रँड स्लॅम फायनल खेळला आहे. विम्बल्डनमध्ये, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्या मानांकित जोकोविचला नवव्या मानांकित नॉरीविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. जोकोविचने पहिला सेट नॉरीकडून 2-6 असा गमावला.

मात्र, पुढच्या तीन सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत नॉरीचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा पराभव करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचने आतापर्यंत 6 वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या तीन वेळा तो येथे सातत्याने चॅम्पियन बनत आहे. जोकोविचच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत तो फेडररसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. हेही वाचा  IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत - पाकिस्तानचा सामना होणार 'या' दिवशी, वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याची आहे संधी

राफेल नदाल या बाबतीत आघाडीवर आहे. नदालने आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. अंतिम फेरीत किर्गिओसचा सामना जोकोविचसमोर, विम्बल्डनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा सामना ऑस्ट्रेलियन खेळाडू किर्गिओसशी होणार आहे. किर्गिओसला उपांत्य फेरीत वॉक ओव्हर मिळाला. राफेल नदालने दुखापतीमुळे विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली. अशा स्थितीत किर्गिओसला उपांत्य फेरीचा सामना न खेळता अंतिम फेरीत स्थान मिळाले.