Photo Credit- X

Mandla Mashimbi is New Coach of South Africa women's Team: दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट संघाने त्यांच्या महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मांडला माशिंबी(Mandla Mashimbi)ची नियुक्ती जाहीर केली आहे. ते डिलन डू प्रीझची जागा घेतील. डिलन डू प्रीझ (Dillon du Preez) यांच्या नेतृत्वाखाली महिला टी-20मध्ये संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. याआधी हिल्टन मोरेंग हे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले होते.

माशिम्बी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, 'मी प्रोटीज महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची नियुक्ती अत्यंत आदराने स्वीकारतो. मला या प्रतिष्ठित पदाशी निगडित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षांची पूर्ण जाणीव आहे. प्रशिक्षक म्हणून माझ्या कार्यकाळात मी अत्यंत कृतज्ञ आहे. मला गेल्या 11 वर्षांत टायटन्स क्रिकेटकडून मिळालेली संधी आणि प्रोटीज महिलांच्या निरंतर यशासाठी प्रयत्नशील आहे.'

माशिंबीने टायटन्स, नाइट्स आणि ग्रिक्वाससाठी क्रिकेट खेळले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्द 2010 मध्ये लवकर संपली. वेगवान गोलंदाज म्हणून, त्यांनी टायटन्स आणि नॉर्दर्नचे प्रतिनिधित्व करताना प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 103 बळी घेतले. त्यांनी 2005/06 मध्ये तीन-दिवसीय आणि एकदिवसीय स्पर्धांमध्ये नॉर्दर्नच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 2009/10 मध्ये दक्षिण आफ्रिका वन-डे चॅलेंजमध्ये संघाचे नेतृत्व केले.