Diogo Jota (फोटो सौजन्य - X/@piersmorgan)

Liverpool Star Diogo Jota Death In Car Accident: क्रिडा क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. लिव्हरपूलचा फॉरवर्ड आणि पोर्तुगीज आंतरराष्ट्रीय खेळाडू डिओगो जोटाचे (Diogo Jota) वयाच्या 28 व्या वर्षी कार अपघातात (Car Accident) निधन झाले. अपघाताच्या वेळी डिओगो जोटा त्याच्या भावासोबत होता. या अपघातात त्याच्या भावाचाही मृत्यू झाला आहे. जोटाने काही दिवसांपूर्वी त्याची दीर्घकाळची मैत्रीण रुट कार्डोसोशी लग्न केले होते. अहवालात म्हटले आहे की स्थानिक वेळेनुसार रात्री 12:40 च्या सुमारास हा अपघात झाला.

टायर फुटल्याने झाला अपघात -

जोटाचा भाऊ आंद्रे देखील एक व्यावसायिक फुटबॉलपटू होता. त्याने पोर्तुगीज दुसऱ्या लीगमध्ये पेनाफिलचे प्रतिनिधित्व केले होते आणि अपघाताच्या वेळी तो कारमध्ये होता. स्पॅनिश सिव्हिल गार्डने दिलेल्या निवेदनात असे उघड झाले आहे की, दोन्ही भाऊ लॅम्बोर्गिनीमध्ये होते आणि ओव्हरटेक करताना टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. (हेही वाचा -Sunil Gavaskar On Team India: टीम इंडियाच्या निवडीवर सुनील गावस्कर संतापले; म्हणाले, 'अशी सुधारणार नाही टीम!')

पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने केली जोटाच्या निधनाची पुष्टी -

अपघाताच्या वृत्तानंतर लगेचच पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशननेही या घटनेची पुष्टी केली. फेडरेशनचे अध्यक्ष पेड्रो प्रोएन्का यांनी जोटासोबत आंद्रे सिल्वाचेही निधन झाल्याची पुष्टी केली. पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन आणि संपूर्ण पोर्तुगीज फुटबॉल आज सकाळी स्पेनमध्ये डिओगो जोटा आणि आंद्रे सिल्वा यांच्या मृत्यूने सगळ्यांनाचं धक्का बसला आहे. राष्ट्रीय अ संघासाठी जवळजवळ 50 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा, डिओगो जोटा हा एक असाधारण खेळाडू होता.