MS Dhoni Signs With Chinese Brand OPPO: महेंद्रसिंग धोनी चा चिनी मोबाईल कंपनी 'ओपो' सोबत करार
महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Getty Images)

MS Dhoni Signs With Chinese Brand OPPO: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एम.एस धोनी (MS Dhoni) ने चिनी मोबाईल कंपनी 'ओपो' (Oppo) सोबत करार केला आहे. आयपीएलपूर्वी धोनीच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. सध्या धोनी आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, चीनी कंपनीसोबत करार केल्याने धोनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर धोनीची ही जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. ओपोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नवी जाहिरात पोस्ट केली आहे. ओपो कंपनीने धोनीसोबतचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ही जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी धोनीला ट्रोल करणं चालू केलं आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणानंतर धोनीने ओपो कंपनीशी कसा काय करार केला? असा प्रश्न नेटीझन्सना आणि धोनीच्या चाहत्यांना पडला आहे. (हेही वाचा - IPL 2020: कोण आहे मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक प्लेयर? दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने घेतले 'हे' नाव)

दरम्यान, या व्हिडिओवर धोनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. करार झाल्याशिवाय कोणताही क्रिकेटपटू कंपनीच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत नाही. मात्र धोनी आणि ओपो कंपनीचा करार झाला असेल, त्यामुळे कंपनीने आयपीएलचे औचित्य साधत धोनीचे काही व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहेत. ओपोचा 4 pro हा स्मार्टफोन 24 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार असल्याचं या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे.