CWG 2022 Medal Table: कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल सारणीवर भारत आठव्या स्थानी, जाणून घ्या कोणत्या देशाला किती पदके मिळाली ?
Commonwealth Games

बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होऊन दोन दिवस उलटले आहेत . आतापर्यंत 39 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या 13 सुवर्णांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे. त्याने पहिल्या दिवशी 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली, दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियन संघाने 5 सुवर्णांसह 16 पदके जिंकली. दुसऱ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये 1 सुवर्णासह 4 पदके जिंकून टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंड पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत 7 सुवर्ण जिंकले आहेत. यजमान इंग्लंड येथे तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या वाट्याला 5 सुवर्ण आले आहेत. 72 देशांपैकी आतापर्यंत एकूण 20 देशांनी पदके जिंकली आहेत.

कॉमनवेल्थ गेम्सची पदक सारणी

 क्रमांंक देश सुवर्ण रोप्य  कांस्य  एकूण
        1.  ऑस्ट्रेलिया  13  8  11  32
        2.  न्युझीलँड  7  4  2  13
        3.  इंग्लंड  5  12  4  21
        4.  कॅनेडा  3  3  5  11
        5. स्कॉटलंड  2  4  6  12
        6.  मलेशिया  2  0  1  3
        7.  साऊथ आफ्रिका  2  0  0  2
        8.  भारत  1  2  1  4
        9. बर्म्यूडा  1  0  0  1