Youth Olympics 2018 | (Photo Credits- Twitter @virendersehwag)

अर्जेन्तिनाची राजधानी ब्युनोस ऐरेसयेथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. जेरेमी लाल्रीन्नुंगा नंतर नेमबाजी प्रकारात सौरभ चौधरी आणि मनु भकेरने सुवर्ण निशाणा लगावला. त्यांनी १०m Air Pistol प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. तर मेहुली घोष आणि तुषार माने यांनी रौप्य मिळवले. जुडो खेळात तबाबी देवी थांग्जामने रौप्य पदक मिळवलं. अशा प्रकारे भारताने आतापर्यंत ६ पदक पटकावले असून त्यात ३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकाचा समावेश आहे.

नक्की वाचा:  Youth Olympics 2018: पंधरा वर्षीय जेरेमी लालरीनुंगामुळे भारताला स्पर्धेत पहिलं सुवर्ण.

भारताने याआधी युथ ऑलिम्पिक २०१४ मध्ये फक्त २ पदक मिळवले होते. यावेळी भारतीय चमूने कौतुकास्पद कामगिरी केली असून अजून बऱ्याच क्रीडा प्रकारात पदकाची संधी आहे.