भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एम. ए चिदंबरम (MA Chidambaram) स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सुरु होईल. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताचा वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेतील 2-1 च्या विजयानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. दोन्ही संघात ही 10 वी द्विपक्षीय मालिका खेळली जात आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला (Indian Team) दोन मोठे धक्के बसले आहेत. सलामी फलंदाज शिखर धवन आणि अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याआधीच दुखापतीमुळे या मालिकेमधून बाहेर पडले आहेत. धवन आणि भुविच्या जागी संघात स्थान मिळालेली मयंक अग्रवाल आणि शार्दूल ठाकूर यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. शिवाय, युजवेंद्र चहल यालाही प्लेयिंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागले आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये या मॅचमधून पदार्पण केले आहे.
मालिका बदली असली तरीच भारतासमोर प्रश्न तोच आहे. टीम इंडियाची मधली फळी कमकुवत दिसत आहे. रिषभ पंत याला अनेक संधी देऊनही तो संधीचा लाभ करून घेऊ शकलेला नाही. टी-20 मालिका गमावल्यावरही विंडीज संघ त्यांच्या कामगिरीने संतुष्ट आहे. मुंबईत झालेल्या टी-20 मालिकेमध्ये दुखापत झालेल्या सलामी फलंदाज एव्हिन लुईस याला विश्रांती देण्यात आली आहे. शाई होप याला विंडीजच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहेत.
अश्या प्रकारे आहे भारत आणि वेस्ट इंडिजचा प्लेयिंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, केदार जाधव, कुलदीप यादव, दीपक चाहर आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस, शाई होप, रोस्टन चेझ, अलझरी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल.