वर्ल्डकप स्पर्धेत भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मॅन्चेस्टर (Manchester)मध्ये सामना सुरु आहे. परंतु पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येत आहे. पावसाआधी पाकिस्तानी संघाने 6 बाद 166 असा स्कोर केला आहे. जरी पाऊस पडत राहिला, तरीही भारताचे जिंकणे निश्चित आहे. सध्या पाकिस्तान संघ डकवर्थ लुईस नियमानुसार अपेक्षित धावसंख्येच्या 86 धावांनी पिछाडीवर आहे आणि त्यांनी आपल्या 6 विकेट्स गमावले आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: Team India ला आणखी एक दणका, भुवनेश्वर कुमारला हि झाली दुखापत, पुढे सामन्यात भाग घेणार नाही)

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत 50.0 षटकांमध्ये 336 धावा केल्या आहेत.  सध्या विजय शंकर गोलंदाजी करत असून पाकिस्तान रनरेट 4.74 आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून विजय शंकरने त्याच्या विश्वकपमधल्या मॅचमध्ये पदार्पण केलं.शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे शंकरला या मॅचमध्ये संधी मिळाली. फलंदाजी करताना विजय शंकर फारशी चमकदार कामगिरी करू शकला नसला तरी त्याने गोलंदाजी करताना विक्रमाची नोंद केली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलला विकेट घेणारा विजय शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.