क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा सामना म्हणजे भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) रविवारी 16 जूनला मॅन्चेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) ला खेळवला जाईल. दोन्ही देशातील चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे. विश्वकप नाही जिंकला तरी चालेल, पण समोरच्या प्रतिस्पर्धीला नामवा असे या दोन देशातील लोकांचे म्हणणे असते. भारत-पाकिस्तान विश्वकप मध्ये पहिल्यांदा 1992 मध्ये आमने-सामने आले होते. (IND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट)
आधीच्या भारत-पाक सामन्यांची (आयसीसी (ICC) किंवा इतर) आठवण काढताच सर्वप्रथम आठवत ते जावेद मियाँदादच्या (Javed Miandad) माकड उड्या आणि वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) ने उर्मट आमीर सोहेलला (Amir Sohail) दिलेले चोख उत्तर. यासारख्याच काही जुन्या आठवणी आज आपण भारत-पाकिस्तान मधील विश्वकप सामन्याच्या निमित्ताने पुहा उजागर करू:
जावेद मियाँदाद- किरण मोरे (Kiran More)
1992 विश्वकप स्पर्धेत पहिल्यांदाच जेव्हा भारत- पाकिस्तान सामना झाला तेव्हा वातावरण जास्तच गरम होते. या सामन्यातलं मुख्य आकर्षण होत ते जावेद मियाँदाद नि मारलेल्या माकड उड्या. जावेद बायटिंग करत असताना मोरेच्या सतत अपिलांमुळे तो चिडला. नंतर त्याचा संताप अनावर झाला आणि अपील करताना किरण मोरे कशा उड्या मारतो (माकड उडी) हे त्याने स्वत:च करून दाखवले. मियाँदादने खेळपट्टीजवळ तीन वेळा जोरजोरात उड्या मारल्या ज्या पुढे ‘जावेदच्या माकड उड्या’ म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि ते आजही लोकांच्या स्मरणात आहे.
वेंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल
1996 च्या उपांत्यपूर्व सामन्यात बेंगळुरू येथे पाकिस्तानी फलंदाज आमीर सोहेल आणि भारताचा वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यातील सामना चांगलाच रंगला. आमीरने प्रसादला एक चौकार मारला त्यानंतर त्याने पुढे येत प्रसादला खुणावून दाखवले की, तुझा पुढचा चेंडूसुद्धा मी असाच सीमापार धाडीन; पण पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्रिफळा उडवून त्याची चांगलीच जिरवली आणि नंतर प्रसादने ‘गो’ अशी जी गर्जना केली.
हरभजन सिंघ (Harbhajan Singh)-शोएबअख्तर (Shoaib Akhtar)
2010 च्या आशिया कप स्पर्धेच्या या सामन्यात हरभजन सिंघ आणि शोएब अख्तर दरम्यानची झालेली चकमकही कायम स्मरणात राहण्यासारखी आहे. हरभजनने अख्तर च्या गोलंदाजीवर दोन षट्कार लगावून पारडे भारताच्या बाजूने झुकवले. मात्र नंतर भज्जी एका चेंडूवर चुकल्यावर शोएबने त्यांच्या भाषेत काही अनुद्गार काढले होते. त्यामुळे भज्जीही चिडला. त्यानंतर मोहम्मद आमीरला षट्कार लगावून भज्जीने भारताला विजय मिळवून दिला होता.
इशांत शर्मा (Ishant Sharma)-कामरानअकमल (Kamran Akmal)
यष्टिरक्षक कामरान अकमल 2012 मधील एका सामन्यात जलद गोलंदाज इशांत शर्माशी भिडला. इशांतचा एका चेंडू काम्रानने चुकवला आणि फॉलोथ्रूमध्ये तो काहीतरी पुटपूटला तेव्हा कामरानने संधी सोडली नाही आणि लगेच इशांतला प्रत्त्युत्तर दिले. त्यामुळे हे दोन्ही पुढे सरसावले मात्र धोनीने मध्यस्थी केल्याने स्तिथी तिथेचशांत झाली.
गौतम गंभीर - शाहीद आफ्रिदी
विश्वचषक सोडून इतर सामन्यांमध्ये 2007 मध्ये कानपूरला गौतम गंभीर व शाहीद आफ्रिदी मधली चकमक अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गंभीरने आफ्रिदीला लाँग ऑनकडे चौकार मारल्यावरवर या दोघांमध्ये काही बातचित झाली आणि पुढचाच चेंडू गंभीरच्या बॅटच्या कडेला लागून स्लीपकडे गेला. त्यावेळी धाव घेताना गंभीर आणि आफ्रिदीची टक्कर झाली आणि मग शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर पंचांना मध्यस्थी करून, वातावरण शांत करावे लागले.