Virat Kohli and MS Dhoni (Photo Credits- PTI)

मागील काही वर्षे क्रिकेट चाहते ह्याच उत्तराच्या शोधात आहे कि एम एस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) मध्ये सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू कोण. कोहली आणि धोनी ह्यांनी त्यांच्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जाऊन भारतीय क्रिकेटच्या श्रेणीत मनाचे स्थान मिळवले आहेत. धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने सर्व मोलाच्या आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकल्या आहेत तर मागील दोन वर्षांत कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावी धावपटूंपैकी एक आहे. सध्या विश्वचषक स्पर्धेचा बुखार उंचावल्यामुळे ट्विटर इंडियाने (Twitter India) ) सोमवारी मतदान सुरु केले आणि चाहत्यांना त्यांचा ऑल-टाईम आवडता क्रिकेटपटू निवडण्यास सांगितले.

तिथे चाहत्यांनी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) पासून राहुल द्रविड (Rahul Dravid), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ते एबी. डी विलियर्स (AB de Villiers) सारख्या महान क्रिकेटर्सला आपली पसंती दिली पण बहुतेक चाहत्यांनी धोनी आणि कोहलीला आपला ऑल-टाईम आवडता क्रिकेटपटू म्हणून निवडले.

धोनी आणि कोहली सध्या इंग्लंडमध्ये चालू असलेल्या विश्वकप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. भारतीय संघाने (Team India) आपले पहिले दोन्ही सामने जिंकून विश्वकपला दिमाख्यात सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला आहे. भारत (India) आपला तिसरा सामना 2015 विश्वकप उपविजेता संघ, न्यूझीलँड (New Zealand) विरुद्ध खेळेल. न्यूझीलँड सध्या ICC च्या गुणतालिकेत वर अव्वल स्थानी विराजमान आहे.