करणची कॉफी चांगलीच भोवली; ब्रँडनी रद्द केले जाहिरातींचे करार
हार्दिक पांड्या (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आपण पहिला आहे. कंगनाच्या वक्त्यव्यामुळे उठलेले वादळ अजूनही लोकांच्या लक्षात असेल, अशातच आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि के.एल.राहुल (KL Rahul) यांनी या शोमध्ये उधळलेल्या मुक्ताफळांमुळे गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी या दोघांशी असलेले करार मोडीत काढले आहेत. हार्दिक पांड्याला पहिला फटका Gillete Mach3ने दिला आहे. यासोबतच इतर कंपन्याही हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन माघारी बोलावण्यात आले आहे. हे दोघे ज्या कंपन्यांच्या जाहिराती करत आहेत, त्या कंपन्याही आता धास्तावल्या आहेत व त्यांनी या दोघांशी असलेले करार मोडायला सुरुवात केले आहे. हार्दिक पांड्या सध्या 7 ब्रँड्सच्या जाहिरातीत दिसतो. तर के. एल. राहुल स्पोर्ट्स वेअरमधील प्रसिद्ध ब्रँड पुमा आणि फिटनेस स्टार्टअप क्युअरफिटशी करारबद्ध आहे. हार्दिक पांड्याशी असलेलें करार रद्द करताना Gillete Mach3 ने, 'हार्दिकच्या विधानाशी कंपनीचा कोणताही संबंध नाही. त्याचे विधान आमची मुल्ये दर्शवत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही स्वत:ला त्याच्यापासूनवेगळे करत आहोत,' असे स्पष्टीकरण कारण दिले आहे. (हेही वाचा : Koffee With Karan मधील वादानंतर BCCI ची हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटीस)

दरम्यान, हरभजनसिंग यांनी या दोघांच्याही वक्त्यव्यावर चांगलीच टीका केली आहे. 'बीबीसीआयने योग्यच पाऊल उचलले आहे, ही कारवाई होणे गरजेचेच होते. बसमध्ये मला पत्नी व मुलीला सोबत घेऊन जावे लागेल आणि त्या बसमध्ये पांड्या व राहुल असतील, तर त्या बसमध्ये मी जाणार नाही' असेही तो म्हणाला.