गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

पूर्व दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी गुरुवारी शहरातील जीबी रोड भागात सेक्स वर्कर्सच्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार जाहीर केला. दिल्लीतील सेक्स वर्कर्सच्या (Sex Workers) 25 अल्पवयीन मुलींची काळजी घेण्याचा 'पंख' (PANKH) हा उपक्रम शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे, असे क्रिकेटपटू-राजकारणीने एका निवेदनात म्हटले. गंभीरने PTIला म्हटले की, "समाजातील प्रत्येकाला सभ्य आयुष्य जगण्याचा हक्क आहे आणि मला या मुलांसाठी अधिक संधी मिळाव्यात अशी इच्छा आहे जेणेकरुन ते त्यांचे स्वप्न जगू शकतील. मी त्यांचे उदरनिर्वाह, शिक्षण आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेईन." या उपक्रमा दरम्यान सध्या दहा मुलींची निवड करण्यात आली आहे जे विविध सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत, असे गंभीर म्हणाला. गंभीरने यावेळी अनेकांना पुढे येण्याचे आवाहन केले. (टी-20 मध्ये रोहित, गेल आणि एबीडीपेक्षा विराट कोहली चांगला, गौतम गंभीरने स्पष्ट केले कारण)

गंभीरने आज ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. गंभीरने ट्विट करत म्हटले की, "माझ्यासाठी हा एक खास दिवस आहे आणि मी काही महत्वपूर्ण बातमी शेअर करू इच्छित आहे. सेक्स वर्कर्सच्या मुलांना त्या नरकापासून मुक्त करण्यासाठी मी 25 मुलांसमवेत “पंख” कार्यक्रम सुरू करीत आहे आणि त्यांच्या सर्व गरजा, निवारा व शिक्षणाकडे लक्ष देत आहे! मी दुसर्यांना विनंती करतो की त्यांनी या योजनेत सहभागी व्हावे आणि त्यांनीही योगदान द्यावे! प्रत्येक लाइफ मॅटर्स!" गंभीरच्या या पुढाकारानंतर सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने देखील या उपक्रमात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की, “पंख”ला एक यशस्वी उपक्रम बनविण्यासाठी अवांछित गर्भधारणा, असुरक्षित गर्भपात, खराब गर्भनिरोधक आणि एसटीडी सारख्या समस्यांचा सामना करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सेक्स वर्कर्सच्या पुनरुत्पादक आणि लैंगिक आरोग्यासाठी सामील इच्छित आहोत.

गंभीरचे ट्विट

प्रियंका रैनाचे ट्विट

दुसरीकडे, गंभीरने आपल्या गौतम गंभीर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कल्याणकारी कामे केली आहेत. गंभीर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या 200 बहाद्दरांच्या मुलांची काळजी यापूर्वीच घेत आहे.