
टीम इंडिया (Team India) बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात दुसरी इनिंग खेळत आहे. तत्पूर्वी, पहिल्या डावात 284 धावा करून इंग्लंडचे खेळाडू सर्वबाद झाले. दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. 75 धावांवर संघाने तीन विकेट गमावल्या. भारताची तिसरी विकेट विराट कोहलीच्या (Virat Kohli) रूपाने पडली. तो 20 धावा करून बाद झाला. मात्र, असे असतानाही त्याने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. इंग्लंडविरुद्ध क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट सामन्यांमध्ये 100 डाव फलंदाजी करणारा कोहली एकमेव भारतीय ठरला आहे. पहिल्या डावात अवघ्या 11 धावा करून कोहली बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने 40 चेंडूंचा सामना केला आणि 20 धावा करून तो बाद झाला.
यादरम्यान त्याने 4 चौकार मारले. सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध 100 डाव फलंदाजी करणारा कोहली एकमेव भारतीय आहे. बर्मिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावात खेळताना कोहलीने 100 डाव पूर्ण केले. या बाबतीत महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने इंग्लंडविरुद्ध 93 डावात फलंदाजी केली आहे. तर सचिन तेंडुलकर 91 डावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हेही वाचा IND vs ENG Test Match: बेअरस्टो आणि कोहली यांच्यातील भांडणावर सेहवागचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
विशेष म्हणजे भारताने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. यादरम्यान रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी संघाकडून शतके झळकावली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावाच करू शकला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने शतक झळकावले. भारतीय संघ आता दुसरा डाव खेळत आहे. जरी त्याची सुरुवात चांगली झाली नाही.