Cristiano Ronaldo Tests Positive For COVID19: फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण; पोर्तुगीज एफएची माहिती
Cristiano Ronaldo (Photo Credits: Twitter)

Coronavirus: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्वसामन्यांपासून तर, अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यातच जगातील सर्वोत्तम फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) संसर्ग झाला आहे. पोर्तुगीज एफएने (Portuguese FA) याबाबत माहिती दिली आहे. यामुळे बुधवारी संध्याकाळी स्वीडनबरोबर नेशन्स लीगच्या सामन्यासाठी तयारी करीत असलेल्या 35 वर्षीय रोनाल्डोने पोर्तुगालचा प्रशिक्षण गट सोडला आहे.

रोनाल्ड हा रविवारी नेशन्स लीगमध्ये फ्रान्स वरोधात ड्रा झालेल्या सामन्यात आणि मागील हफ्यात स्पेन विरोधात ड्रा झालेल्या सामन्यात खेळला होता. सोमवारी युवेंट्सच्या फोरवर्डने ट्विटरवर आपल्यासह पोर्तुगीज टीमच्या इतर खेळाडूंसोबत जेवतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत अनेक खेळाडून एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसले. तर, रोनाल्ड हा सर्वांच्यासमोर सेल्फी घेताना दिसत आहे. हे देखील वाचा-Sagarika Ghatge and Zaheer Khan Expecting First Child: सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्याकडे गोड बातमी? कपल आई-बाबा होणार असल्याची चर्चा

ट्वीट-

 

रोनाल्डोचे जगभरात असंख्य चाहते आहे. रोनाल्डोला कोरोनाची लागण झाल्याची समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठीही अनेकजणांनी प्राथना केली आहे.