सुपरस्टार Triple H यांच्याकडून विश्वचषक विजेता इंग्लंड क्रिकेट संघाला WWE Championship बेल्ट गिफ्ट, पहा हे Photos
जोफ्रा आर्चर आणि जेसन रॉय (Photo Credit: Twitter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया संघ मॅन्चेस्टरच्या मैदानावर अ‍ॅशेस (Ashes) मालिकेच्या चौथ्या सामन्यात आमने-सामने येण्यास सज्ज आहे. यजमान इंग्लंडने तिसऱ्या टेस्टमध्ये अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या तुफानी खेळीच्या जोरावर विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. स्टोक्ससह 12 व्या क्रमांकावरील फलंदाज जॅक लीच याने देखील महत्वाची भूमिका बजावली. याआधी इंग्लंडने पहिल्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडला विश्वचषकच्या सर्वात वादग्रस्त फायनलमध्ये पराभूत करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयानंतर डब्ल्यूडब्ल्यूईचे दिग्गज आणि टॅलेंट, लाइव्ह इव्हेंट्स आणि क्रिएटिव्हचे कार्यकारी उपाध्यक्ष, ट्रिपल एच (Triple H) यांनी कस्टमाइज्ड डब्ल्यूडब्ल्यूई वर्ल्ड चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड क्रिकेट संघाला भेट दिला आहे. (Ashes 2019: मॅनचेस्टर टेस्टआधी स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध)

याबाबत ट्रिपल एचने 19 जुलै रोजी ट्विटरद्वारे घोषणा केली होती. आणि आता त्याच्या वचनाप्रमाणे गुरुवारी इंग्लंड क्रिकेट संघाला हा कस्टमाइज्ड डब्ल्यूडब्ल्यूई चँपियनशिपचा बेल्ट मिळाला. इंग्लंड क्रिकेटने याबाबत ट्विट करत माहिती दिली आणि त्यांच्या काही खेळाडूंचे- जोफ्रा आर्चर, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर आणि टेस्ट टीम कर्णधार जो रूट यांचे या बेल्टसहितचे फोटोज शेअर केले. शिवाय, त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूई आणि डब्ल्यूडब्ल्यूई युके यांचे आभार देखील मानले. पहा बेल्टसह इंग्लंड क्रिकेट संघाचे फोटो इथे:

इंग्लंड क्रिकेट

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर चित्तथरारक विजय मिळवला. स्टोक्स याने एकतर्फी झुंज देत ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला. 28 वर्षीय स्टोक्सने 219 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकार लगावून नाबाद 135 धावा फटकावल्या. त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.