IND W vs BAN W, Women's T20 World Cup 2020 Live Streaming: भारत विरुद्ध बांग्लादेश महिला टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर
भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: IANS)

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या (Women's T20 World Cup) पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध शानदार विजय मिळवल्यावर भारतीय महिला संघ (India Women's Team) सोमवारी पर्थमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या सामन्यात बांग्लादेशचा सामना करेल. शुक्रवारी झालेल्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारताने चार वेळाच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध 132 धावांचे यशस्वीरित्या बचाव केले होते. दीप्ती शर्माने फलंदाजीत नाबाद 49 धावा केल्या तर पूनम यादवने गोलंदाजीत केवळ 19 धावा देऊन चार विकेट घेत भारताला 17 धावांनी शानदार विजय मिळवून दिला. असे असूनही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघ बांग्लादेशला हलक्यात घेऊ शकत नाही कारण त्यांना 2018 मध्ये टी-20 आशिया चषकात दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. (Women’s T20 World Cup 2020: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी)

भारत-बांग्लादेश महिला टी-20 विश्वचषक सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता खेळला जाईल. नाणेफेक दुपारी 4 होईल. हा सामना पर्थच्या वाका स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

सोमवारी जर भारत जिंकला तर पाच संघांच्या गटातच्या नॉकआउट फेरीच्या जवळ पोहचेल. तथापि, ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत आणि 132 सारखा कमी स्कोर केल्याने त्यांना भारताला त्यांच्या फलंदाजीत सुधार करावा लागेल. तिरंगी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत आणि सलामी फलंदाज स्मृती मंधाना पहिल्या सामन्यात योगदान देण्यात अपयशी ठरले. या दोघींकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बांग्लादेशबद्दल बोलायचे झाले तर ते अष्टपैलू जहानारा आलम आणि अव्वल फळीतील फलंदाज फरगाना हक यांच्यावर अवलंबून असेल. बांग्लादेशची सर्वात अनुभवी खेळाडू कर्णधार सलमा खातूनही फलंदाजी आणि चेंडूने योगदान देऊ शकते.

असे आहे भारत-बांग्लादेश महिला संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, स्मृति मंधाना, शिखा पांडे, अरुंधति रेड्डी, जेमिमाह रॉड्रिक्स, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा, पूनम यादव आणि राधा यादव.

बांग्लादेश: सलमा खातुन (कॅप्टन), रूमाना अहमद, आयशा रहमान, फहीमा खातुन, फरगना हक, जहानारा आलम, ख़दीजा तुल कुबरा, सोभना मोस्तरी, मुर्शीदा खातुन, नाहिदा अख्तर, निगार सुल्ताना (विकेटकीपर), पन्ना घोष, रितु मोनी, संजीदा इस्लाम, शमीमा सुल्ताना.