इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter/ICC)

डेन वान निकर्कच्या (Dane van Niekerk0 अष्टपैलू खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका महिला संघाने (South Africa Women's Team) टी-20 वर्ल्डकप मध्ये पहिल्यांदा इंग्लंड (England) विरुद्ध विजय मिळवला. रविवारी पर्थ येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्याच्या अंतिम क्षणात एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले जेव्हा इंग्लंड संघातील खेळाडूने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बाद केले नाही. हा सामना दक्षिण आफ्रिकाने जरी जिंकला, परंतु या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्व क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज कैथरीन ब्रंटला (Katherine Brunt) शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज मंकड नियमाने बाद करण्याची संधी होती, परंतु तिने खेळाडू वृत्ती दाखवत तिला बाद केला नाही. (Women's T20 World Cup 2020: वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवानंतर थाईलँड महिला टीमने अशाप्रकारे मानले चाहत्यांचे आभार, जिंकली मनं VIDEO)

शेवटच्या चार चेंडूंवर आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. कैथरीन गोलंदाजी करायला आली तेव्हा दुसऱ्या टोकाला उभ्या असलेली सुने लुउसने चेंडू टाकण्याआधीच क्रीज सोडली. कैथरीनकडे तिला 'मंकड' नियमाद्वारे धावबाद करून सामना पालटवायची संधी होती, पण तिने याउलट केले आणि पुन्हा गोलंदाजी करायला गेली. ब्रंटच्या पुढील चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकला आणि इंग्लंडने सामना गमावला. आयसीसीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. कैथरीनच्या या कृतीनंतर सोशल मीडिया यूजर्स तिचे कौतुक करत आहेत.

पाहा काय म्हणाले नेटकरी:

चांगले केले कैथरीन ब्रंट

खूप छान कैथरीन

आमच्या आणि ............ मधे फरक आहे.

गोलंदाज प्रेमास पात्र आहे

ग्रुप बी मधील सामन्यात इंग्लंडने पहिले फलंदाजी करत 8 बाद123 असा स्कोर केला. ज्याच्या उत्तरात दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या षटकात केवळ 4 विकेट गमावून विजय मिळविला. डेन वान निएकेर्क ला अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. तिने 46 धावा केल्या आणि 2 विकेटही मिळवले. आज अ गटात भारताचा सामना बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाचा सामना श्रीलंकेशी होईल. दोन्ही सामने पर्थमध्ये खेळले जातील.