महिला टी-20 चॅलेंज (Photo Credit: Twitter/BCCI)

Women’s T20 Challenge Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी महिला आयपीएलचे (Women's IPL) वेळापत्रक जाहीर केले आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि मिताली राज (Mithali Raj) महिला टी-20 चॅलेंजच्या (Women's T20 Challenge) आगामी मोसमात अनुक्रमे सुपरनोवा (Supernova), ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि वेलोसिटी (Velocity) संघाचे कर्णधार असतील. 4 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल आणि संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे 9 नोव्हेंबरपर्यंत खेळली जाईल. चार सामन्यांच्या या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि न्यूझीलंडमधील काही प्रमुख स्टर्ससह भारताच्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू सहभागी होतील. आपल्या देशासाठी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिले अर्धशतक झळकावणारी थायलंडची नत्थाकन चांथम देखील या स्पर्धेत सहभागी होणारी देशाची पहिला महिला क्रिकेटपटू ठरणार आहे. 2020 महिलांचा टी-20 चॅलेंजचा सुरुवातीच्या सामन्यात मागील वर्षाचे उपविजेते सुपरनोवा आणि वेलोसिटी यांच्यात लढत होईल.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर महिला टी-20 चॅलेंजचे ऐतिहासिक सामने खेळले जातील असे म्हटले जात आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार पहिला, तिसरा आणि अंतिम समान संध्याकाळी 6 वाजता, तर दुसरे सामना दुपारी 2 वाजता खेळला जाईल. पहिल्या सामन्यात सुपरनोवा आणि वेलॉसिटी आमने-सामने येतील, दुसऱ्या सामन्यात वेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर व तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लाझर्स आणि सुपरनोवा यांच्यात लढत होईल.

पाहा महिला टी-20 चॅलेंजचे संघ

सुपरनोवास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्स, चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया, शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.

ट्रेलब्लेझर: स्मृती मंधाना (कॅप्टन), दीप्ती शर्मा, पुनम राऊत, रिचा घोष, डी हेमलथा, नुजत परविन, राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चांथम, डिएंड्रा डॉटिन, काश्वी गौतम.

वेलोसिटी: मिताली राज (कॅप्टन), शाफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य,सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेघ कासपेरेक, डेनियल व्याट, सुने ल्यूस, जहानारा आलम, एम अनघा.