India National Cricket Team vs Australia Men's National Cricket Team 3rd Test 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test 2024) ब्रिस्बेन (The Gabba, Brisbane) येथे होणार आहे. आता या मालिकेतील सर्व सामने जिंकणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे झाले आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर आणि त्याच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर कर्णधारालाही फॉर्ममध्ये परतावे लागेल. तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सलामीची जोडी पुन्हा एकदा बदलू शकते. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test 2024: गाबामध्ये टीम इंडियाचा कसा आहे विक्रम? 'या' तीन खेळाडूंवर असेल नजर)
चाहत्यांना रोहितकडून शानदार पुनरागमनाची अपेक्षा
रोहित शर्मा पर्थ कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसले. सलामीला राहुलची कामगिरी बऱ्यापैकी होती, पण रोहित शर्माने ॲडलेड कसोटीत पुनरागमन केले. या सामन्यात रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला आणि सलामीला आला नाही, पण रोहितचा फ्लॉप शो क्रमांक-6वरही पाहायला मिळाला. रोहितने ॲडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 3 रन्स आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 6 रन्स केले होते. मात्र, राहुललाही ॲडलेड कसोटीत विशेष काही करता आले नाही.
रोहित शर्मा पुन्हा करु शकतो डावाची सुरुवात
रोहितच्या उपस्थितीत राहुल पहिल्यांदाच ओपनिंग करताना दिसला. आता रोहित पुन्हा एकदा ओपनिंग करताना दिसेल अशी अपेक्षा आहे. रोहित बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसत आहे. आता चाहत्यांना रोहितकडून शानदार पुनरागमनाची अपेक्षा आहे, ज्यामुळे टीम इंडियाचा तणाव कमी होईल.
मायदेशातही रोहित शर्मा ठरला होता फ्लाॅप
दुसरीकडे, रोहितच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शनही वाढले आहे. गेल्या अनेक डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून एकही दर्जेदार खेळी झालेली नाही. याआधी न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेतही रोहित फ्लॉप ठरला होता. अहवालानुसार, पुनरागमन करण्यासाठी रोहितने त्याच्या आधीच्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्यामुळे संघाचा समतोलही राखला जाईल.