Bangladesh Womens National Cricket Team vs West Indies Womens Cricket Team, 3rd ODI Match Pitch Report: बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजे 24 जानेवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स येथे खेळला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाने वेस्ट इंडिजचा 60 धावांनी पराभव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश महिला संघाचा कॅरिबियन संघाविरुद्धचा हा पहिलाच विजय होता. यासह बांगलादेश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) वेस्ट इंडिजचे नेतृत्व करत आहे. तर, बांगलादेशचे नेतृत्व निगार सुलताना (Nigar Sultana) करत आहे.
खेळपट्टीचा अहवाल (WI vs BAN Pitch Report):
वॉर्नर पार्क, बासेटेरे येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही उपयुक्त ठरू शकते, परंतु वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते. या सामन्यात जास्त धावा अपेक्षित आहेत. खेळपट्टी वेगवान असेल आणि गोलंदाजांसाठी ती आव्हानात्मक असू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. या खेळपट्टीवर गेल्या 12 पैकी 10 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामने जिंकले आहेत.
हवामान अंदाज (Weather Report)
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे आणि तापमान 24 अंशांच्या आसपास राहील. या काळात हवामान थंड राहील. पूर्ण सामना अपेक्षित आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
वेस्ट इंडिज महिला संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (यष्टीरक्षक), डिएंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया अॅलेन्बी, झैदा जेम्स, मॅंडी मँगरू, अफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसर, करिश्मा रामहारॅक.
बांगलादेश महिला संघ: शोभना मोस्तारी, मुर्शिदा खातून, निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), शर्मिन अख्तर, शोर्ना अख्तर, जन्नतुल फरदौस, जहांआरा आलम, रितू मोनी, नाहिदा अख्तर, संजिदा अख्तर मेघला, राबेया खान.