Photo Credit-X

IPL 2025: जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग, इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स निश्चितच (MI) सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. मात्र. या हंगामात त्यांना काही विजयाचा सूर सापडलेला नाही. 2008 मध्ये सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक पाच ट्रॉफी  मुंबई इंडियन्सने जिंकल्या आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जनेही (CSK)तेवढ्याच ट्रॉफी जिंकल्या आहेत. म्हणून यंदाच्या मौसमात चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या जर्सीत पाच स्टारर्सचा समावेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर आपल्याला पाच स्टार पहायला मिळतात. मात्र, हे मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर का पहायला मिळत नाही.

विजेते टीम्स आणि जर्सी

  • चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत पाच स्टारर्सचा समावेश केला आहे.
  • गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या जांभळ्या रंगाच्या जर्सीवर त्यांच्या लोगोच्या वरच्या बाजूला तीन गोल्डन स्टार लावले आहे.
  • चार वेळा विजेत्या केकेआरने त्यांच्या जर्सीच्या बाहीवर सोनेरी आयपीएल लोगो लावला आहे.

आयपीएलमधील सर्व टीम त्यांच्या खेळाडूंच्या जर्सीत बदल करत असताना एमआयने कोणताही बदल केलेला नाही.

मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये तारे का नाहीत?

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 ची ट्रॉफी पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. एमआय जर्सीमध्ये कोणतेही स्टार नसल्याच्या गोष्टीवर मुंबई इंडियन्सतडून भाष्य करण्यात आले आहे. आयपीएल 2025 च्या जर्सीमध्ये तारे नसण्याचे एक संभाव्य कारण म्हणजे त्यांच्या जर्सीवर स्टार्सएवजी स्टार्सच्या रुपात असलेले खेळाडू आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह सारखे स्टार,दिग्गज खेळाडू त्यांच्या जर्सीमध्ये असणे असा विश्वास आहे, असा दावा मुंबई इंडियन्स एफसीने केला आहे.