
मुंंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. याशिवाय, रोहितने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता आयपीएल व्यतिरिक्त, चाहत्यांना रोहितला एकदिवसीय क्रिकेटमध्येही खेळताना दिसेल. आता रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागेल.
चाहत्यांना पाहावी लागेल वाट
टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा 20 जूनपासून सुरू होईल, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. ही मालिका ऑगस्टपर्यंत खेळवली जाईल. लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो या दौऱ्यात टीम इंडियाचा भाग असणार नाही. त्याच्या जागी शुभमन गिलला कर्णधार बनवता येवु शकते.
रोहित ऑगस्टमध्ये खेळताना दिसेल
इंग्लंड दौऱ्यानंतर, टीम इंडिया ऑगस्टमध्ये बांगलादेशचा दौरा करेल. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसेल. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 17 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. याशिवाय, दुसरा आणि तिसरा सामना 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. एवढेच नाही तर या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाईल, परंतु रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे तो या मालिकेचा भाग असणार नाही.
चाहत्यांना आता रोहित शर्मा फक्त एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसेल. अशा परिस्थितीत, त्याला खूप लांब ब्रेक देखील मिळेल. चाहत्यांना आशा आहे की रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय सामने खेळत राहील.