जेव्हा विराट मराठीत बोलतो... पृथ्वी शॉ ने सांगितला भारतीय कर्णधार चा मजेदार किस्सा ( Watch Video )

विराट कोहलीचे (Virat Kohali) अनेक किस्से आहेत ज्याची चर्चा नेहमीच होत असते मग त्याची विनोद  वृत्ती  असो किंवा मग त्याचे डान्स स्टेप असो. कोणत्याना कोणत्या कारणांसाठी त्याच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. विराट कोहली एक चांगला सहकारी, कप्तान आहेच तसेच तो इतर खेळाडूंबरोबर नेहमी हसत खेळत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. विराट कोहलीच्या या स्वभावाचा एक किस्सा समोर आला आहे. खेळाडू पृथ्वी शॉ ने विराट आणि त्याच्यातल्या एक प्रसंग शेअर केला आहे. (India’s Predicted XI For 2nd Test Vs England: भारतीय संघ इंग्लंडला देणार टक्कर; दुसऱ्या कसोटी सामन्यात 'या' 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरण्याची शक्यता)

कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सोबत मराठीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रसंगाचा किस्सा पृथ्वी ने विक्रम साठ्ये यांच्याबरोबर मुलाखती दरम्यान शेअर केला. यामुलाखतीत पृथ्वी शॉने ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे आहे याबात सांगितले आहे. तसेच विराट कोहली कशा पद्धीतने संघबांधणी करतो याबाबतही सांगितले आहे.

पाहा व्हिडिओ

या आधी ही पृथ्वी शॉ ने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत विराट बद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या.मैदानावरचा विराट आणि मैदानाबाहेरचा विराट यात खूप फरक आहे. मैदानावर विराट जितका आक्रमक असतो तितकाच मैदानाबाहेर तो दिलखुलास आहे.असे त्याने सांगितले होते.तसेच विराटच्या विनोदी स्वभावाचा पृथ्वीला पहिल्या दिवशीच प्रत्यय आला होता त्याने पृथ्वी ला चीअर अप करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तेव्हाही त्याच्याशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.असे ही पृथ्वी म्हणाला होता.