ICC Cricket World Cup 2023 Tickets: भारत-पाकिस्तानसह विश्वचषक 2023 सामन्यांची तिकिटे कधी आणि कशी करणार बुक? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

ICC Cricket World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता, मात्र आता तो एक दिवस आधी खेळवण्यात येणार आहे. कारण या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होत असल्याने आणि गुजरातमध्ये नवरात्रीला खूप गर्दी होत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला (BCCI) या दिवशी सामना आयोजित न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आता हा सामना एक दिवस आधी होणार आहे. मात्र, स्टेडियममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा मोठा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जाईल, त्याच्या एक दिवस आधी या सामन्याचे आयोजन केले जाईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता

अनेक वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर सामना होणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्येकाला स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहायचा आहे. तिकीटांबाबत लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की ते कधी आणि कसे बुक करायचे. या संदर्भात, आम्ही तुम्हाला भारत आणि पाकिस्तानसह उर्वरित विश्वचषक सामन्यांची तिकिटे कशी बुक करू शकता ते सांगणा आहोत. (हे देखील वाचा: Pakistan Squad for Asia Cup 2023: आशिया चषकसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2 वर्षांनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन; भारतासमोर असणार तगडे आव्हान)

भारत-पाकिस्तानसह विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंग कधी सुरू होणार?

भारत-पाकिस्तानसह विश्वचषक 2023 सामन्यांच्या तिकिटांची विक्री 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, 15 ऑगस्टपासून चाहत्यांना त्यांची पूर्व नोंदणी करता येईल. यामुळे त्यांना तिकिटांबाबत अपडेट मिळत राहतील. यासाठी तुम्हाला www.cricketworldcup.com/register या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्ही आयसीसी वेबसाइट आणि अधिकृत तिकीट भागीदारांच्या वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुक करू शकता.

भारताच्या सामन्यांच्या तिकीट खरेदीचे वेळापत्रक

वि. ऑस्ट्रेलिया - 31 ऑगस्ट

वि. अफगाणिस्तान - 31 ऑगस्ट

वि. बांगलादेश - 31 ऑगस्ट

वि. इंग्लंड - 1 सप्टेंबर

वि. न्यूझीलंड - 1 सप्टेंबर

वि. श्रीलंका - 1 सप्टेंबर

वि. पाकिस्तान - 3 सप्टेंबर

वि. दक्षिण आफ्रिका - 2 सप्टेंबर

वि. नेदरलँड्स - 2 सप्टेंबर