PBKS

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match, IPL 2025: आयपीएल 2025 मधील आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज(RCB vs PBKS) सामना आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. मात्र, पावसामुळे खेळसह प्रेक्षकांच्या आशांवर पाणी पडण्यची शक्यता आहे. ज्यामुळे दोन्ही फ्रँचायझींच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या शक्यतांवर परिणाम झाला आहे. आरसीबी (RCB) पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज सामना झाल्यास ती पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. तर पंजाब किंग्जलाही तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. यामुळे ही लढत खूपच रोमांचक बनते. मात्र, आता हा सामनाच धोक्यात आला आहे.

What will be the impact on the standings if the RCB vs Punjab match is cancelled See the effect of rain

पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?

दुर्दैवाने, जर आज संध्याकाळी बेंगळुरूमध्ये आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना रद्द झाला तर, आयपीएल नियमांनुसार, दोन्ही संघांमध्ये एक गुण दिला जाईल. सामना मध्यरात्रीपर्यंत पुढे ढकलू शकतात. मात्र, कोणत्याही आयपीएल 2025 सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.