WI vs BAN (Photo Credit - X)

West Indies National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team, 2nd T20I Match 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील  (T20I Series)  दुसरा सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना सेंट व्हिन्सेंटच्या (St Vincent)  अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन (Arnos Vale Ground, Kingstown)  येथे भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता खेळवला जाईल. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजची नजर असेल. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell)  या मालिकेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व करत आहे. तर, बांगलादेशची कमान लिटन दासच्या (Litton Das)  खांद्यावर आहे. (हेही वाचा  -  India WTC Final Scenario: गाबामध्ये पराभव झाला तर भारताच्या अडचणी वाढणार, डब्ल्यूटीसी फायनलसाठी 'या' संघांवर राहावे लागणार अवलंबून)

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशला 3-0 ने जिंकून बॅकफूटवर ढकलले आहे आणि आता टी-20 मालिकेतही आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. दुसरीकडे, हा सामना बांगलादेशसाठी आत्मविश्वास आणि कामगिरी सुधारण्याची संधी असेल. कारण पहिल्या सामन्यत त्यांनी विजय प्राप्त केला आहे.

एकदिवसीय मालिकेत 3-० ने विजय मिळवल्यानंतर या टी-20 सामन्यात सध्या वेस्ट इंडिजचा संघ 1- 0 ने पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजकडे जॉन्सन चार्ल्ससारखा घातक फलंदाज आहे. याशिवाय एव्हिन लुईस, ब्रँडन किंग, निकोलस पूरन या खेळाडूंमध्ये डाव सांभाळण्याची आणि मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत अल्झारी जोसेफ संघाचे नेतृत्व करेल, जो विकेट घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो.

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश दुसरा T20 सामना ऑनलाइन कुठे आणि कसा पाहायचा?

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या प्रसारणाची माहिती भारतीय दर्शकांसाठी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर उपलब्ध नाही. मात्र, चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. क्रिकेटप्रेमींना येथून सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), एविन लुईस, ब्रँडन किंग, केसी कार्टी, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, जस्टिन ग्रीव्हज, अल्झारी जोसेफ, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, ओबेद मॅककॉय.

बांगलादेश : तनजीद हसन, सौम्या सरकार, लिटन दास (कर्णधार), जाकर अली (यष्टीरक्षक), अफिफ हसन/शमीम हसन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, तन्झिम साकीब, रिशाद हुसेन, नसुम अहमद.