अल-वकील क्रिकेट लीग (Photo Credit: Twitter)

Al-Wakeel Cricket League: टी-20 सामन्यातील शेवटच्या षटकातील थराराचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, पण ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एका सामन्यात फलंदाजाने चौकार मारला नाही, षटकारही नाही खेचला किंवा गोलंदाजाने नो बॉल टाकला नाही तरीही सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 5 धावा करून संघाने विजयीरेष ओलांडली. तुम्हाला विचित्र वाटेल, पण एका सामन्यात असे घडले आहे. ते पाहणारे लोक देखील अचंबित झाले. पाकिस्तानातील (Pakistan) कराची शहरात सुरू असलेल्या अल-वकील क्रिकेट लीगच्या (Al-Wakeel Cricket League) सामन्यात हा प्रकार घडला. (NZ vs BAN 2nd Test 2022: एका चेंडूत 7 धावा, क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड सलामीवीर Will Young ने खेळला असा अप्रतिम शॉट Watch Video)

20 षटकांत विजयासाठी 155 धावांचा पाठलाग करताना ऑटोमॉलकडे केवळ दोन विकेट्स शिल्लक होत्या तेव्हा राहिल माजे आणि अदील अबिद शाम यांनी एक फटकेबाजी केली. अखेरच्या क्षणी ऑटोमॉल संघांची स्थिती 150/8 अशी होती आणि फक्त एक षटकार त्यांना स्पर्धा जिंकण्यास मदत करू शकला असता. गोलंदाजाने पूर्ण चेंडू टाकला जो राजेने लाँग ऑनच्या दिशेने मारला. फलंदाजाला यादरम्यान एक धाव मिळाली असती किंवा जास्तीत जास्त दोन धावा पण क्षेत्ररकांच्या चुकीमुळे ते पाच धावांत बदलले. फलंदाजांनी दोन धावा पूर्ण करताच लाँग ऑनवर असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्यात गोळा केला आणि आनंदात गोलंदाजीच्या टोकाकडे धाव घेतली. पण जो पर्यंत तो स्टंपच्या बेल्स उडवतो तो पर्यंत फलंदाज क्रीजच्या आत पोहोचतो आणि 3 धावा पूर्ण झाल्या असतात.

यानंतर तोच क्षेत्ररक्षक दुसऱ्या टोकाकडे धावतो आणि फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकतो. यावेळी चेंडू विकेटला न लागत थर्ड मॅनच्या दिशेने जातो. दरम्यान विजयासाठी आवश्यक असलेल्या 50 धावा पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी आणखी दोन धावा घेतल्या. अलीकडेच न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगने एका चेंडूत 7 धावा केल्या होत्या.