सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा T20 विश्वचषक (T20 WC 2022) आता उत्कंठा शिगेला पोहोचला आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) या T20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. भारताचा शेवटचा सामना रविवारी (6 ऑक्टोबर) झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला (Team India) उपांत्य फेरीतील (Semi Final) आपले स्थान पक्के करायचे आहे. त्याचबरोबर या सामन्यात विराट कोहलीची नजर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) या मोठ्या विक्रमावर असेल. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने आतापर्यंत 4 डावात 220.00 च्या सरासरीने 220 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आहेत.

विराट कोहली रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यासाठी येईल तेव्हा त्याची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाकडे असेल. खरे तर, आयसीसी टी-20 विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी एकत्र करून भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (हे देखील वाचा: विराट कोहली T20 वर्ल्ड कपचा बनला 'किंग', ICC ने खास व्हिडिओ शेअर करून केला त्याचा सन्मान)

सचिन तेंडुलकरने आयसीसी विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्हीमध्ये 2719 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने एकही टी-20 वर्ल्ड कप खेळलेला नाही. त्याचबरोबर विराट कोहलीने टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 2624 धावा केल्या आहेत. विराट कोहली आता सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यापासून फक्त 95 धावा दूर आहे. विराट कोहलीने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध 96 धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल.